शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त शिक्षकाच्या बदलीसाठी शाळा बंद

By admin | Updated: October 20, 2016 00:31 IST

टाळे ठोक आंदोलन : तीन दिवसांपासून नामपूर येथील विद्यार्थ्यांची हेळसांड

सटाणा : विद्यार्थ्यांना मारहाण करणे, शिक्षक व पालकांशी अरेरावी करणे यामुळे वादग्रस्त ठरलेल्या शिक्षकाची प्रशासनाने पुन्हा त्याच शाळेत बदली केल्याने संतप्त झालेल्या नामपूर येथील सरपंच सोनाली निकम यांच्यासह शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळेला टाळे ठोकून तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत त्या शिक्षकाची अन्यत्र बदली केली जात नाही तोपर्यंत टाळे बंद आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने आज बुधवारी तिसऱ्या दिवशीही शिक्षकांनी झाडाखाली वर्ग भरविले. त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड झाली.जिल्हा परिषदेचे शिक्षक पंडित शंकर कापडणीस हे विद्यार्थ्यांना मारहाण करतात, शिक्षक व पालकांशी अरेरावी करतात या आरोपांमुळे अंबासन, इंदिरानगर, नामपूर येथील ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन करून त्यांच्या बदलीची मागणी केली. वादग्रस्त ठरलेल्या त्या शिक्षकाची प्रशासनाने गंभीर दखल घेत बदलीही केली होती. मात्र संबंधित शिक्षकाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आपल्यावर प्रशासनाने अन्याय केला म्हणून दाद मागितली होती. न्यायालयानेही त्यांची बदली गैरसोयीच्या ठिकाणी करू नये असे सूचित केले होते.दरम्यान, शासनाच्या नियमानुसार ज्या शाळांमध्ये कोणी शिक्षक वादग्रस्त ठरून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन त्या ठिकाणी पुन्हा बदली करू नये असे असताना प्रशासनाने त्या शिक्षकाची बदली पुन्हा नामपूर येथे केली आहे. त्यामुळे अधिकच वाद चिघळला आहे. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रताप सावंत, सरपंच सोनाली निकम, सदस्य कविता सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक सावंत, बाजार समितीचे संचालक समीर सावंत, छोटू टोकरवाला, नारायण सावंत, माजी सरपंच प्रमोद सावंत यांनी त्या शिक्षकाला रु जू करून घेण्यास विरोध केला. यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी तत्काळ शाळेला टाळे ठोकून त्या वादग्रस्त शिक्षकाची अन्यत्र बदली केल्याशिवाय टाळे उघडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. दरम्यान, तीन दिवस उलटूनही एकही अधिकारी न फिरकल्याने आज दुपारी अशोक सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून कैफियत मांडली. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गट शिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांची कानउघडणी केली. त्यानंतर आज दुपारी बच्छाव यांनी सरपंच निकम व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांशी दोन तास चर्चा केली. मात्र त्या शिक्षकाच्या बदलीसंदर्भात ठोस आश्वासन न दिल्याने टाळे बंद आंदोलन सुरूच आहे. (वार्ताहर)