शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
4
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
5
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
7
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
8
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
9
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
10
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
11
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
12
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
13
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
14
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
15
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
16
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
17
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
18
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
19
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
20
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

भंगार बाजार भुईसपाट

By admin | Updated: January 8, 2017 01:37 IST

महापालिकेची कारवाई : प्रचंड पोलीस फौजफाटा, व्यावसायिकांना हादरा

नाशिक : महापालिकेने शहराच्या इतिहासात शनिवारी (दि.७) अनधिकृत बांधकामविरोधी सर्वांत मोठ्या कारवाईला सुरुवात केली. चुंचाळे शिवार व अंबड-लिंकरोडवर गेल्या २० वर्षांपासून अनधिकृतपणे वसलेल्या भंगार बाजारावर महापालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालविला आणि ठरलेल्या नियोजनानुसार सहा विभागांपैकी दोन विभागांतील एकूण ९४ अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले. व्यावसायिकांचा किरकोळ विरोध वगळता पहिल्या दिवशी मोहीम शांततेत पार पडली. बाजार वाचविण्यासाठी सारे प्रयत्न विफल ठरल्यानंतर महापालिकेने केलेल्या या कारवाईने भंगार बाजार व्यावसायिकांना हादरा बसला आहे. विस्तीर्ण भागात पसरलेल्या या भंगार बाजारविरोधी आणखी काही दिवस मोहीम सुरू राहणार आहे.गेल्या वीस वर्षांपासून या ना त्या कारणाने अभय मिळत गेलेल्या अनधिकृत भंगार बाजारासाठी शनिवारचा दिवस काळा ठरला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी भंगार बाजार हटविण्याचा निर्धार बोलून दाखविला आणि त्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या नियोजनानंतर प्रत्यक्ष बाजारावर शनिवारी हातोडा पडला. महापालिकेने १५ डिसेंबर २०१६ रोजी भंगार बाजार व्यावसायिकांना नोटिसा बजावल्यानंतर आयुक्तांनी कारवाईसाठी ७ जानेवारीचा मुहूर्त निश्चित केला होता. त्यानुसार, सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबड-लिंकरोडवर जेसीबी, पोकलॅनसह वाहनांचा प्रचंड ताफा, पोलिसांचा फौजफाटा व महापालिकेच्या सहा पथकांतील सुमारे २५० कर्मचारी येऊन पोहोचले आणि ९ वाजेपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली. बजरंगनगरपासून ते दत्तमंदिर चौकापर्यंतच्या पहिल्या भागातील अनधिकृत शेड व पक्की बांधकामे हटविण्यात आली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर चक्काचूर झालेले पत्रे व लोखंडाचा अक्षरश: खच पडला. काही व्यावसायिकांनी पथक येण्यापूर्वीच स्वत:हून जेवढा माल वाचविता येईल त्यासाठी प्रयत्न केले.