शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात गौणखनिज माफियांना धडकी

By admin | Updated: March 14, 2017 23:15 IST

तहसीलदारांची मोहीम : १३ ट्रॅक्टर्सवर कारवाई

सटाणा : बागलाण तालुक्यात प्रशिक्षणार्थी तहसीलदार विनय गौडा यांनी गौणखनिज माफियांच्या मुसक्या आवळल्या. दोन दिवसांत वाळू, मुरूम, दगड आणि मातीची अनधिकृत वाहतूक करणाऱ्या तब्बल १३ ट्रॅक्टर्सवर कारवाई केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.तहसीलदारांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन कॉप्यांचा पाऊस पडत असलेल्या नामपूर आणि लखमापूर परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांचा अहवाल मंडळाला पाठविल्याने इतर केंद्रप्रमुखांनी चांगलाच धसका घेतला आहे. बागलाण तालुक्यात नव्यानेच आयएएस अधिकारी असलेले विनय गौडा तहसीलदार म्हणून रुजू झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री तहसीलदार गौडा यांनी मोसम खोऱ्यात वाळूसह अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या माफियांच्या विरोधात धडक कारवाई केली. एकाच रात्री नामपूर, द्याने व ताहाराबाद येथून सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. द्याने येथील सतीश कापडणीस,नामपूर येथील भालचंद्र पवार, नाना भामरे, सुभाष पाटील व ताहाराबाद येथील वाळूचा एक ट्रॅक्टर , श्रावण पवार यांच्या मालकीचा दगड वाहतूक करणारा ट्रॅक्टर असे सहा ट्रॅक्टरर्स जप्त केल्याने मोसम पट्ट्यात अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे. तहसीलदार गौडा यांनी अनधिकृत वीटभट्ट्याही टार्गेट केल्या असून, ठेंगोडा येथील विविध अनधिकृत वीटभट्ट्यांवर छापे टाकून तब्बल सात ट्रॅक्टरर्स जप्त केले आहेत. अलियाबाद व ठेंगोडा येथील दोन ट्रॅक्टरर्स नियमानुसार दंड आकारणी करून सोडण्यात आले आहेत. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार नामपूर औट पोस्ट येथे सहा, तर सटाणा तहसील आवारात सात असे १३ ट्रॅक्टर्स जप्त आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दंड भरल्याशिवाय कोणत्याही वाहन सोडणार नसल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे. बागलाणमधील सर्वच खडी क्रेशर्सला तहसीलदार गौडा यांनी सील ठोकत नियमानुसार रॉयल्टी भरली नसल्याचा ठपका ठेवला आहे.