शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटांची रेशन दुकाने आचारसंहितेच्या कचाट्यात

By admin | Updated: October 29, 2016 01:12 IST

बचतगटांची रेशन दुकाने आचारसंहितेच्या कचाट्यात

नाशिक : नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने जिल्ह्यातील २४५ रेशन दुकानांचे परवाने बचतगटांना देण्याच्या कार्यवाहीला ब्रेक बसला असून, साधारणत: जानेवारीच्या अखेरीस प्रत्यक्षात दुकाने सुरू करण्याचा पुरवठा खात्याच्या प्रयत्न असला तरी, त्यावेळीही जिल्ह्णात जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू राहणार असल्याने मार्चनंतरच्या मुहूर्तावरच दुकाने उघडण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत वेळोवेळी पुरवठा खात्याच्या वतीने करण्यात आलेल्या रेशन दुकान तपासणी मोहिमेत दोषी आढळून आलेल्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले, तर काही दुकानदार धान्याचा काळाबजार करताना सापडल्यामुळे अशांचेही दुकाने बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. अशा दोषी २४५ दुकानांचे पुनरुज्जीवन करताना त्यात महिलांच्या बचत गटांना प्राधान्य देण्याच्या शासनाच्या धोरणानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयाने १४ आॅक्टोबर रोजी जाहीरनामे प्रसिद्ध केले. दरम्यान, दोनच दिवसांत राज्यात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जारी करण्यात आली. तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या बचत गटांच्या प्रस्तावांची छाननी करून ते २३ नोव्हेंबरपर्यंत पुरवठा कार्यालयात सादर करून २३ डिसेंबर रोजी जिल्हा पुरवठा कार्यालय त्यावर अंतिम निर्णय घेणार होते. जानेवारीत ग्रामसभांची अनुमती मिळाल्यावर साधारणत: फेब्रुवारी महिन्यात परवाने अदा करून प्रत्यक्ष दुकाने सुरू करण्यात येणार होती. तथापि, सध्या नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने जाहीरनामे प्रसिद्ध करूनही प्रत्यक्षातील अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आलेली आहे. तथापि, नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर लगेचच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू होणार असून, डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू केली जाईल. त्यामुळे बचत गटांना रेशन दुकाने देण्यात पुन्हा अडचणी निर्माण होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी मार्चमध्ये संपुष्टात येणार असल्याने त्यानंतरच बचत गटांना परवाने देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तालुकानिहाय रेशन दुकाने नाशिक तालुका - १२, नाशिक शहर - ६, इगतपुरी - १०, त्र्यंबकेश्वर - १०, दिंडोरी - १८, पेठ - १७, निफाड - ३९, सिन्नर - १६, येवला - १०, नांदगाव - ११, चांदवड - १८, देवळा - ६, कळवण - १९, सुरगाणा - २४, मालेगाव तालुका - ९, मालेगाव शहर - १ व बागलाण - १९.