शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारपासून सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:34 IST

१७५ वर्षांपेक्षा प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा ५०वा जिल्हा साहित्यिक मेळावा शनिवार (दि. २३)पासून सुरू होणार असल्याची माहिती सावानातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. दोन दिवस चालणाºया या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षपदी नाट्यलेखक दत्ता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिक : १७५ वर्षांपेक्षा प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा ५०वा जिल्हा साहित्यिक मेळावा शनिवार (दि. २३)पासून सुरू होणार असल्याची माहिती सावानातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. दोन दिवस चालणाºया या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षपदी नाट्यलेखक दत्ता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.शनिवार (दि. २३) आणि रविवार (दि. २४) या दोन दिवसीय साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार असून, या महोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता त्र्यंबकरोड येथील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीला सुरुवात होणार असून, सकाळी ११ वाजता या साहित्य संमेलनाचे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मोठ्या दिमाखात उद्घाटन होणार आहे. शनिवारी संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुसºया सत्रात ‘नाटक : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, यात ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे (पुणे) आणि लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते योगेश सोमण यांचा समावेश असणार आहे, तसेच यानंतर ‘कविता : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादात माजी साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांचा समावेश असणार आहे. परिसंवादानंतर जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील यांचा आतापर्यंतचा साहित्यप्रवास उलगडून दाखविणाºया स्लाइड शोचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच मेळाव्याच्या पहिल्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात खुल्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ कवियत्री रेखा भंडारे कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. साहित्य मेळाव्याच्या दुसºया दिवसाची सुरुवात मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील यांच्या बीज भाषणाने होणार असून, यानंतर ‘समाज माध्यमांचे साहित्यावर होणारे परिणाम’ या विषयावरील परिसंवादात समीक्षक मंदार भारदे (मुंबई) आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र मलोसे (चांदवड) उपस्थित साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत. यानंतर गेल्या ४९ वर्षांत जिल्हा साहित्यिक मेळाव्याने काय दिले? या संवादपर कार्यक्रमातून मान्यवर आपापले अनुभव कथन करणार आहेत.