शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरकरांचे पाेस्ट कार्यालयाचे स्वप्न होणार ३५ वर्षांनंतर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST

सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटलगत गेल्या ३५ वर्षांपासून पोस्ट कार्यालयासाठी भूखंड पडून आहे. पोस्ट विभागाने म्हाडाकडून ही जागा ...

सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटलगत गेल्या ३५ वर्षांपासून पोस्ट कार्यालयासाठी भूखंड पडून आहे. पोस्ट विभागाने म्हाडाकडून ही जागा घेतली होती. या जागेवर पोस्ट कार्यालय उभारण्यात यावे म्हणून गेल्या २५ वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू होता. हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने मागील पंचवार्षिक काळात नगरसेवक सलीम शेख यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधून पोस्ट कार्यालय उभारणीसाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती. त्यानुसार खासदार गोडसे यांनी जागेची पाहणी करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

प्रस्तावित भूखंडावर पोस्ट कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी म्हाडा आणि नाशिक महानगरपालिकेच्या विभागाकडून ना हरकत दाखला अवश्यक होता. मात्र या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. खासदार गोडसे यांनी स्वतः प्रयत्न करुन म्हाडा व महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवून दिल्याने पोस्ट कार्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच सरकारकडून इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध होणार आहे. सदर बांधकामाची वर्कआउट ऑर्डर निघाली असून, येत्या महिनाभरात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात सातपूर विभागात डाक विभागाचे स्वतंत्र कार्यालय कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

इन्फो==

सातपूर येथे सुसज्ज असे पोस्ट कार्यालयाची इमारत उभी राहणार आहे. या कार्यालयात नागरिकांना पोस्टाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच आधुनिक सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या स्वतंत्र कार्यालयात साधारण १५ ते २० अधिकारी, कर्मचारी यांची संख्या असणार आहे. त्यामुळे या भागातील ग्राहकांमध्ये आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण पसरले आहे.