शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरकरांचे पाेस्ट कार्यालयाचे स्वप्न होणार ३५ वर्षांनंतर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:11 IST

सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटलगत गेल्या ३५ वर्षांपासून पोस्ट कार्यालयासाठी भूखंड पडून आहे. पोस्ट विभागाने म्हाडाकडून ही जागा ...

सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटलगत गेल्या ३५ वर्षांपासून पोस्ट कार्यालयासाठी भूखंड पडून आहे. पोस्ट विभागाने म्हाडाकडून ही जागा घेतली होती. या जागेवर पोस्ट कार्यालय उभारण्यात यावे म्हणून गेल्या २५ वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू होता. हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने मागील पंचवार्षिक काळात नगरसेवक सलीम शेख यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधून पोस्ट कार्यालय उभारणीसाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती. त्यानुसार खासदार गोडसे यांनी जागेची पाहणी करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

प्रस्तावित भूखंडावर पोस्ट कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी म्हाडा आणि नाशिक महानगरपालिकेच्या विभागाकडून ना हरकत दाखला अवश्यक होता. मात्र, या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. खासदार गोडसे यांनी स्वतः प्रयत्न करून म्हाडा व महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवून दिल्याने पोस्ट कार्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच सरकारकडून इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध होणार आहे. सदर बांधकामाची वर्कआउट ऑर्डर निघाली असून, येत्या महिनाभरात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात सातपूर विभागात डाक विभागाचे स्वतंत्र कार्यालय कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

इन्फो==

सातपूर येथे सुसज्ज अशी पोस्ट कार्यालयाची इमारत उभी राहणार आहे. या कार्यालयात नागरिकांना पोस्टाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे, तसेच आधुनिक सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या स्वतंत्र कार्यालयात साधारण १५ ते २० अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या असणार आहे. त्यामुळे या भागातील ग्राहक आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण पसरले आहे.