शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरची घटना : तीन महिन्यांनंतर ‘त्या’ जळीत मृतदेहाची पटली ओळख

By admin | Updated: March 17, 2017 01:22 IST

प्रियकरानेच विवाहितेची हत्त्या केल्याचे उघड

नाशिक : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वासाळी शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आलेल्या एका अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. सदर मृतदेह ज्योती पवार नामक विवाहितेचा असून, तिची हत्त्या प्रियकराने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील वासाळी शिवारातील एका डोंगराच्या निर्जन परिसरात १९ डिसेंबर रोजी अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. सदर मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला होता. महिलेचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज सातपूर पोलिसांनी वर्तविला होता. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनी चर्चा करून तपासाला गती दिली. सदर महिलेच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्त्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना पंचनाम्यात निदर्शनास आले; मात्र संशयिताने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे महिलेचा चेहरा ओळखू येत नव्हता. यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान होते. पोलिसांनी शहर व ग्रामीण भागातील हरविलेल्या महिलांची यादी तपासली. सर्वत्र या मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत प्रयत्न केले; मात्र चेहरा जळालेला असल्यामुळे मयत महिलेची ओळख पटत नव्हती. सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये राहणारी ज्योती ऊर्फ अश्विनी पवार नावाची महिला मागील दोन महिन्यांपासून परिसरात दिसून येत नसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधारे धिवरे, झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे पोलीस निरीक्षक अविनाश सोनवणे यांनी तपासाची चक्रे त्या दिशेने फिरविली. बेपत्ता झालेल्या ज्योतीच्या आईकडे चौकशी केली असता, पोलिसांना तिचे मनीष नावाच्या एका इसमाशी आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती हाती आली. पोलिसांनी तत्काळ मनीषचा सुगावा घेत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली. (प्रतिनिधी)पैशांच्या मागणीवरून खूनज्योतीकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. अनेकदा पैसे देऊनदेखील ती पैशासाठी दबाव टाकत होती. यामुळे तिला १७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पैशाचे आमिष दाखवून वासाळी शिवारातील डोंगराजवळ नेऊन तिचा धारदार शस्त्राने खून केल्याची कबुली मनीष याने पोलिसांना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनीष याने चाकूने वार करून डोक्यावर दगड मारून खून केला व पेट्रोल टाकून मृतदेह पेटवून देत पळ काढल्याचे सिंगल यांनी यावेळी स्पष्ट केले.