शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधणीत सातपूर विभाग अग्रेसर

By admin | Updated: August 21, 2016 23:41 IST

स्वच्छता अभियान : ८६३ पूर्ण, तर ६३३ प्रगतिपथावर; हगणदारीमुक्तच्या दिशेने प्रयत्न सुरू

गोकुळ सोनवणे  सातपूरकेंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीत अन्य विभागांपेक्षा आघाडी घेऊन सातपूर हगणदारीमुक्तच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. सातपूर विभागासाठी असलेल्या उद्दिष्टांनुसार १६०३ पैकी ८६३ शौचालय पूर्ण झाले असून, ६३३ शौचालयांचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र ही योजना राबविताना अनेक ठिकाणी बांधण्यात आलेल्या शौचालयांना आउटलेटची सोयच नसल्याने बांधण्यात आलेल्या अशा शौचालयांचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सातपूर परिसरातील काही भागांतील (विशेषत: झोपडपट्टीत) घरांमध्ये शौचालय नसल्याने तेथील नागरिक, महिला रस्त्याच्या कडेला उघड्यावर शौचास बसत असतात. उघड्यावर शौचास बसू नये म्हणून महापालिकेच्या वतीने जनजागृती आणि उपाय योजना करण्यात येत होत्या, परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागाप्रमाणे सातपूरलादेखील हगणदारीमुक्त योजना राबविण्याची मागणी होत होती.केंद्रशासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरात शौचालय नसलेल्या नागरिकांसाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सातपूर परिसरातील ज्या नागरिकांच्या घरात शौचालय नाहीत अशा नागरिकांच्या घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. जवळपास साडेचार हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि पात्र नागरिकांचे अहवाल स्वच्छ भारत अभियानाकडे पाठविण्यात आले होते. यात १६०३ लाभपात्र व्यक्ती निश्चित करण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी सातपूरचे विभागीय स्वछता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्यावर सोपविण्यात आली होती.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आलेल्या प्रस्तावानुसार ज्या नागरिकांचे स्वत:चे घर आहे.आणि शौचालय बांधण्यासाठी जागा आहे. अशा लाभार्थींना बारा हजारांपैकी सहा हजार रु पयांचा पहिला हप्ता देण्यात आला. त्या पैशातून घराजवळ शौचालय बांधायला सुरु वात झाली.अर्धवट बांधकाम केलेल्या कामाचे छायाचित्र सादर केल्यानंतर उर्वरित हप्ता अदा करण्यात आला. अशा पद्धतीने शौचालयाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. शौचालय बांधकामावर निरीक्षणाची जबाबदारी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. १६०३ पैकी ८६३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले. ६३३ शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे, तर १०७ शौचालये तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण होऊ शकलेले नाहीत. महाराष्ट्र शासनाअंतर्गत संत गाडगे महाराज स्वछता अभियानाचे दोन पुरस्कार सातपूर विभागाला मिळालेले आहेत. शौचालयाची ही योजना लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे आणि महापालिकेच्या जनजागृतीमुळे यशस्वी होऊ शकली आहे. शहरात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे, मात्र सातपूर विभाग ही योजना राबविण्यात अग्रेसर राहिला आहे.