नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे नाशिकमध्ये आले असून, त्र्यंबकेश्वरनजीक तळवाडे येथील एका बैठकीसाठी ते आले आहेत़ सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सेवाग्राम एक्स्प्रेसने ते नाशिकरोड रेल्वेस्थानकात दाखल झाले़ त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरजवळील तळवाडे येथे रवाना झाले़ तळवाडे येथे योग विद्याधाममधील सभागृहात संघाच्या केंद्रीय समितीची बैठक असून, या बैठकीसाठी ते आले आहेत़ देशभरातील केवळ ३० ते ३५ केंद्रीय सदस्य या बैठकीसाठी आवर्जून दाखल झाले आहेत़ भागवत हे चार दिवस मुक्कामी असून, या बैठकीत अनेक महत्त्वाचे विषय चर्चिले जाणार असल्याचे समजते़ भागवत हे चार दिवस येथे वास्तव्यास असून, त्यानंतर ते रवाना होतील़ सध्या संघाचा ‘घर वापसी’ हा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश देण्याचा उपक्रम गाजत असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ही बैठक औत्सुक्याचा विषय आहे़ तथापी स्थानिक पातळीवर या बैठकीबाबत कमालीच गुप्तता पाळण्यात येत आहे़
सरसंघचालक भागवत नाशकात
By admin | Updated: January 7, 2015 00:56 IST