शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकर सुरू होत नसल्याने सरपंचांचा राजीनामा

By admin | Updated: February 1, 2016 23:38 IST

निमगाव, सिन्नर : खासदार, आमदार शिवसेनेचे असूनही उपयोग नाही

सिन्नर : शिवसेनेचे सिन्नर तालुका उपप्रमुख व निमगाव-सिन्नरचे सरपंच बाळासाहेब सानप यांनी गावासाठी पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू होत नसल्याने सरपंचपदाचा राजीनामा आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे सुपूर्द केला.राज्यात सेना-भाजपाचे सरकार आहे. नाशिकचे खासदार व सिन्नरचे आमदार शिवसेनेचे असताना तसेच सरपंचही शिवसेनेचा असूनही गावात पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू नसेल तर त्या सरपंच पदाचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करीत सानप यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला. सरपंच पदाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याने पाण्यासाठी गावातील महिलांचे होणारे हाल आपल्याला पाहावत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निमगाव-सिन्नर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निमगावच्या वाड्यावस्त्यांवर एका टॅँकरच्या दोन फेऱ्या सुरू आहेत. गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहिरीनेही तळ गाठल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील विहिरीचे पाणी आटत आले असतानाच आपण वाढीव टॅँकरचा प्रस्ताव तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचा दावा सानप यांनी केला आहे. सार्वजनिक विहीर पूर्णपणे आटलेली असताना मागणी करूनही गावासाठी टॅँकर सुरू होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गावात चार हातपंप असून, त्यापैकी तीन बंद आहेत. त्यामुळे एका हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिलांची पहाटेपासूनच मोठी गर्दी होते. गावात तीन सार्वजनिक विहिरी असून, दलितवस्तीवरील विहिरीला केवळ दोन फूट पाणी असून, ते केवळ आठ दिवस पुरेल असे सानप यांचे म्हणणे आहे. गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना तहसीलदार ग्रामस्थांची टंचाईच्या विषयावर चेष्टा करीत असल्याचा आरोपही सानप यांनी केला आहे. पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही टॅँकर सुरू केला जात नसल्याचे सानप यांनी म्हटले आहे. सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत असल्याने तहसीलदारांच्या कारभाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी तहसीलदारांवर अंकुश ठेवावा, अशी मागणीही सानप यांनी केली आहे. (वार्ताहर)