शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महिला बालकल्याण सभापतिपदी सरोज अहिरे

By admin | Updated: May 12, 2017 23:05 IST

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाकडून सरोज अहिरे यांनी, तर उपसभापतिपदासाठी कावेरी घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाकडून सरोज अहिरे यांनी, तर उपसभापतिपदासाठी कावेरी घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून सभापतिपदासाठी नयना गांगुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी, समितीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने सभापतिपदी सरोज अहिरे यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच बाकी आहे.  महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी सोमवारी (दि. १५) दुपारी ४ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीवर तौलनिक संख्याबळानुसार भाजपा-५, शिवसेना-३ आणि राष्ट्रवादी-१ असे पक्षीय बलाबल आहे. समितीवर भाजपाच्या कावेरी घुगे, प्रियंका घाटे, भाग्यश्री ढोमसे, सरोज अहिरे व शीतल माळोदे, शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, नयना गांगुर्डे व पूनम मोगरे आणि राष्ट्रवादीच्या समीना मेमन यांची नियुक्ती झालेली आहे. शुक्रवारी (दि. १२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार, भाजपाकडून सभापतिपदासाठी नाशिकरोड विभागातून निवडून आलेल्या सरोज अहिरे यांनी, तर उपसभापतिपदासाठी सिडको विभागातील कावेरी घुगे यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिव ए. पी. वाघ यांच्याकडे सुपूर्द केले. तर शिवसेनेकडून केवळ सभापतिपदासाठी नयना गांगुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सरोज अहिरे यांच्या अर्जावर सूचक म्हणून उद्धव निमसे, तर अनुमोदक म्हणून स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या स्वाक्षऱ्या असून, कावेरी घुगे यांच्या अर्जावर सूचक म्हणून जगदीश पाटील व अनुमोदक म्हणून सुरेश खेताडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिवसेनेच्या नयना गांगुर्डे यांना सूचक म्हणून विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते तर अनुमोदक म्हणून गटनेता विलास शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अहिरे व घुगे यांनी अर्ज दाखल केला त्याप्रसंगी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक उद्धव निमसे, जगदीश पाटील, सुरेश खेताडे आदी उपस्थित होते, तर गांगुर्डे यांनी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. सेनेकडून औपचारिक विरोधविभागीय आयुक्तांनी रिपाइंसोबत गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळल्याने त्याविरुद्ध शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सध्या बाब न्यायप्रविष्ट आहे. महिला व बालकल्याण समितीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असतानाही केवळ न्यायालयीन याचिकेसमोर वेगळा संदेश जाऊ नये, याची पुरेपूर काळजी शिवसेना घेत असून, त्यासाठीच औपचारिक विरोध म्हणून सभापतिपदासाठी नयना गांगुर्डे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. सेनेने उपसभापतिपदासाठी अर्ज दिलेला नाही, त्यामुळे कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड झालेली आहे.