शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरदवाडी रस्ता बनला धोकादायक

By admin | Updated: February 9, 2016 23:02 IST

गतिरोधकाची मागणी : भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे पादचारी, विद्यार्थी धास्तावले

 सिन्नर : येथील सिन्नर-सरदवाडी रस्त्यावर वाहने भरधाव जात असल्याने पादचारी व विद्यार्थी धास्तावले आहेत. या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी नगरसेवक बापू गोजरे यांच्यासह नवजीवन डे स्कूल, कीडझ् अकॅडमी, इरा इंटरनॅशनल स्कूल, सरदवाडी प्राथमिक विद्यामंदिर व शारदा महाविद्यालयाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक उपविभागीय अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आडवा फाट्यापासून दोन किलोमीटरपर्यंतच्या सरदवाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचे अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. सरदवाडी रस्त्यावरील मधुर मिठास, वाजे लॉन्स, कर्पे सुपर मार्केट व अजिंक्यतारा हॉटेलजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याठिकाणी गतिरोधक बसविण्याबाबत सिन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावही मंजूर करण्यात आला आहे. सरदवाडी रस्त्यालगत शिवाजीनगर, कमलनगर, सरस्वतीनगर, संजीवनीनगर, महालक्ष्मीनगर, वृंदावननगर, झापवाडी, मॉडर्न कॉलनी, शांतीनगर, विनर संकुल, देशमुखनगर, साईबाबानगर, महादेव कॉलनी, ढोकेनगर आदिंसह अनेक उपनगरे आहेत. डांबरीकरणामुळे वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या जीवितास धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सरदवाडी रस्त्यावर चार ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अभियंता अशोक पाटील यांना नगरसेवक गोजरे यांनी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)