शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सप्तसुरांनी घडला राष्ट्रभक्तीचा संगम

By admin | Updated: August 12, 2016 23:06 IST

वंदे मातरम : शास्त्रीय गायनाला दाद

नाशिक : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या ‘वंदे मातरम’ गीताच्या सर्व कडव्यांचे वेगवेगळ्या विविध रागांमधील सादरीकरणाने नाशिककरांनी देशभक्तीची आनंदानुभूती देणारी सप्तसुरांची संगीतसंध्या अनुभवली. धीरगंभीर, भीमपलाश आणि लयदार शुद्ध सारंग अशा मिश्र स्वरूपाच्या रागांमधून सादरीकरण केलेल्या वंदे मातरम गीताने सप्तसुरांमध्ये राष्ट्रभक्तिरसाचा संगम घडवून आणला.श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित या कार्यक्र मात बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम गीताला विविध रागांमध्ये सादर करण्यात आले. तत्पूर्वी अभिनंदन थोरात, डॉ. सत्येन जोशी, अर्जुन टिळे, शिवाजी गांगुर्डे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, पल्लवी धर्माधिकारी आदिंनी दीपप्रज्वलन केले. या संगीत मैफलीत गायक ज्ञानेश्वर कासार, आशिष रानडे आणि रागिणी कामतीकर यांनी वेगवेगळ्या रागात पाचही कडवे सादर केले. यातील दोन चाली नव्याने लावण्यात आल्या होत्या. त्यांना ओंकार अपस्तंभ, सतीश पेंडसे (तबला), सुभाष दसककर (हार्मोनियम), अनिल धुमाळ (की बोर्ड), मोहन उपासनी (बासरी), अनिल दैठणकर (व्हायोलीन), उमेश खैरनार (आॅक्टोपॅड) यांची साथसंगत लाभली. निवेदक स्वानंद बेदरकर यांनी वंदे मातरम गीतातील शब्दांचा सुरांशी संगम साधला. त्यानंतर सुरू झालेला कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगला. दरम्यान, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरु मित बग्गा, नगरसेवक शाहू खैरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)