शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील शाळांनी गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2016 07:39 IST

विद्यार्थ्यांची भरारी : बहुतांश इंग्रजी शाळांचा निकाल शंभर टक्के

 नाशिक : दहावीच्या निकालात यंदाही शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी घवघवीत यश संपादन केले आहे. याबरोबरच अनेक मराठी माध्यमांच्या शाळांनीदेखील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. शहरातील न्यू ईरा इंग्रजी माध्यम शाळेचा निकाल १०० टक्के लागला. आदिती मुंदडा या विद्यार्थिनीने ९५.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला, तर भुदर सारंग याने ९५ टक्के गुण मिळवून द्वितीय तर ओम देशमुख याने ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. शाळेतील ४५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. तर १३४ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ब्रह्मा व्हॅलीअंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली पब्लिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला. अजिंक्य चौधरी या विद्यार्थ्याने ९०.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला, तर देवेश झा याने ९०.४० तर रोहन घुगे याने ९०.२० यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. व्ही. एन. नाईकव्ही. एन. शिक्षण प्रसारक संस्थेचा सरासरी निकाल ९४.७४ टक्के इतका लागला. हिंदी माध्यमिक विद्यालय, संत जनार्दन स्वामी विद्यामंदिर, माध्यमिक विद्यामंदिर, चिंचोली, माध्यमिक विद्यालय, पास्ते, शहीद श्रीकांत बोडके विद्यामंदिर, वडझिरे आणि माध्यमिक विद्यामंदिर, देशवंडी या शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. तर माध्यमिक विद्यामंदिर, राणेनगर, माध्यमिक विद्यामंदिर, राजापूर, माध्यमिक विद्यामंदिर, ब्राह्मणवाडे, माध्यमिक विद्यामंदिर, एकलहरे, निऱ्हाळे, माळेदुमाला, बेलगाव हाळे, माळेगाव, वेहेळगाव, नळवाडपाडा, कासारी, दातली, जळगाव, धारणगाव वीर, धुळवाड, पाटोळे आणि शिवरे या शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला. श्री श्यामलाल गुप्ता विद्यालयश्री श्यामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.११ टक्के इतका लागला. ७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. २५ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. रिना यादव (९२.८०), विजय यादव (९२.४०) टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले. नाशिक हिंदी सभा संस्था संचलित श्री ललिता प्रसाद पोद्दार अकॅडमी या इंग्रजी शाळेचा निकाल १०० टक्के लागला. (प्रतिनिधी)