शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दिवसभर संततधार

By admin | Updated: September 20, 2015 23:43 IST

नाशिककरांत समाधान : सुटी असूनही दिवस काढला घरातच

नाशिक : शहरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली असून, रविवारी सकाळपर्यंत एकूण १६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठा दिलासा लाभला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने ओढ दिल्याने काळजीची स्थिती निर्माण झाली होती. नाशिक शहरामध्येही पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र शुक्रवारी (दि.१८) कुंभमेळ्याच्या तिसऱ्या पर्वणीच्या पहाटे तीन वाजेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सलग अठरा तास पाऊस सुरू होता. शनिवारीही अधून-मधून पावसाच्या सरी कोसळतच होत्या. रविवारी तर सकाळपासूनच संततधार सुरू झाली. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वर्दळ होती. सुटी असूनही नागरिक घराबाहेर न पडल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. शहराच्या काही भागांत विजेचा लपंडावही सुरू होता. दरम्यान, रविवारी जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेली पावसाची मिलिमीटरमध्ये नोंद अशी : नाशिक (६.३), इगतपुरी (२६), दिंडोरी (२), पेठ (२६.३), त्र्यंबकेश्वर (७), चांदवड (१), कळवण (२.२), सुरगाणा (९५.२), देवळा (०.६). (प्रतिनिधी)