शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृत विषयातील किचकटपणा झाला दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:10 IST

नाशिक : या शैक्षणिक वर्षात आठवी, नववीचा अभ्यासक्रम बदलला असून, त्यातील किचकटपणा दूर करून तो बहुआयामी व हसतखेळत शिकता येऊ शकेल, अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : या शैक्षणिक वर्षात आठवी, नववीचा अभ्यासक्रम बदलला असून, त्यातील किचकटपणा दूर करून तो बहुआयामी व हसतखेळत शिकता येऊ शकेल, अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली आहे.  आजवर संस्कृतच्या पुस्तकातील क्रमिक धड्यांमध्ये संस्कृत नाटक, ग्रंथ यातील उतारे असायचे. त्यावरच भाषांतर करा, समानार्थी शब्द सांगा, विरुद्धार्थी शब्द सांगा असे प्रश्न असायचे. आता संस्कृतच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार संस्कृतच्या पुस्तकात संस्कृतमधूनच धडे व त्यांच्यावर आधारित प्रश्नोत्तरेही संस्कृतमध्येच दिलेली आहेत.  संस्कृत महाकाव्यातील एखादा तुकडा, उतारा, नाटकातील एखादा प्रसंग, कादंबरीतील एखादा भाग याबरोबरच पर्यावरण, चालू घडामोडी यांचाही समावेश करण्यात आला आहे. बदललेल्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात साहित्य, वेद, परंपरा यांबरोबरच विज्ञान, अंधश्रद्धा, मनोरंजन जगत यांच्यावरील प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. संस्कृतच्या विद्यार्थ्यांना संस्कृतमधूनच बोलता यावे, संस्कृतचे प्रश्न संस्कृतमधूनच सोडवता यावे, या उद्देशाने संस्कृतच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. संस्कृत शिक्षकांना संस्कृतचे अध्यापन याच विषयामधून करता यावे, संस्कृत उच्चार संस्कृत भाषेतूनच करता यावेत यावरही यात भर देण्यात आला आहे. आजवर इतर भाषांतून शिकवले जाणारे संस्कृत आता शुद्ध संस्कृतमधूनच शिकले गेले पाहिजे, संस्कृतमधून आत्मविश्वासपूर्वक संवाद साधता येईल इतपत विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे हे आता नवीन अभ्यासक्रमानुसार शक्य होणार आहे.असे आहे नववीच्या पुस्तकाचे स्वरूप बदललेल्या अभ्यासक्रमानुसार नववीच्या पुस्तकात संस्कृतमधून प्रार्थना, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, १ ते १०० संख्यांचा तक्ता, दैनंदिन वापराच्या वस्तूंची चित्रे व त्यांचे संस्कृतमधील नाव, अकबर-बिरबलाची गोष्ट, वाक्य कसे बनवायचे, जोडशब्द कसे बनवायचे, अवयवमाला, मोबाइलचे फायदे व तोटे सांगणारी आधुनिक युवतीची गोष्ट, शिक्षक व विद्यार्थ्यांचा संवाद सांगणारी गोष्ट, संस्कृतमधून घड्याळाचे वाचन, सकाळ, दुपार व सायंकाळची प्रार्थना, राणीची गोष्ट, नाटक, श्यामची आई पुस्तकातील गोष्ट, काव्यशास्त्र विनोद, युवकाचे दिवास्वप्न सांगणारी छोटी गोष्ट आदींचा समावेश असून, संस्कृत विषय किचकट न वाटता आवडीचा, सोपा वाटेल अशा प्रकारे पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.संस्कृत विषयाचा अभ्यास आता संस्कृतमधून करणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांआधी संस्कृत विषय संस्कृत शिक्षकांनाच नीट शिकवता आला पाहिजे. त्यांचे संस्कृत उच्चार योग्य असले पाहिजे. आजवर संस्कृत विषय स्कोअरिंगचा विषय आहे. चांगले मार्क्स मिळाले, प्रमाणपत्र मिळाले की संपले असे अनेकांचे धोरण असायचे. आता मात्र संस्कृत भाषा मुखात येईल, तिचा गांभीर्याने अभ्यास करता येईल यावर भर देण्यात आला आहे. संस्कृत विषयाची गोडी लागावी, विद्यार्थ्यांनी शाळेनंतरही संस्कृतचा अभ्यास करावा, हा या मागचा उद्देश आहे.- डॉ. गजानन आंभोरे, प्रांत, संस्कृत अध्यापक संघ