शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक उपक्रम राबवावेत संजय दराडे : येवल्यात गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:13 IST

गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी यांसारख्या वाद्यांवर अवाजवी खर्च करण्यापेक्षा विविध सामाजिक उपक्रम राबवून पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहराच्या नावलौकिकात भर घालावी, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.

येवला : गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी यांसारख्या वाद्यांवर अवाजवी खर्च करण्यापेक्षा विविध सामाजिक उपक्रम राबवून पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहराच्या नावलौकिकात भर घालावी, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.आगामी पोळा, गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर व तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शांतता समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी भीमराज दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.राहुल खाडे, शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील, तालुका पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे, सेनेचे नेते संभाजी पवार, शहर काझी रफीऊद्दीन शेख, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, विकास ताटेकोंडीलवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. येवला शहरातील वाहतुकीच्या समस्येवर नगर परिषदेने ट्रॅफिक सिग्नलसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करून येवला-विंचूर चौफुलीसह गंगा दरवाजा नाका व फत्तेबुरुज नाका येथे वाहतूक पोलिसांची २४ तास नेमणूक करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ‘एक गाव, एक गणपती’ अंतर्गत तालुक्यातील २८ गावांतील गणेश मंडळांचा सत्कार ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेंद्र लोणारी, संतोष परदेशी, गणेश शिंदे, प्रवीण बनकर, रूपेश लोणारी, अविनाश कुक्कर, गुड्डू जावळे, प्रसाद पाटील, शहर काँग्रेसचे राजेश भंडारी, झुंजार देशमुख, वाल्मीक गोरे, राजेंद्र परदेशी, दिनेश परदेशी, शैलेश देसाई, समीर समदडिया, अक्षय राजपूत, आलमगीर शेख, एजाज शेख उपस्थित होते.