शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू साडेआठ हजार रूपये ब्रास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 18:40 IST

राज्य सरकारने दोन वर्षापुर्वी घोषित केलेल्या वाळू उपसा धोरणात नंतरच्या काळात अमुलाग्र बदल करण्यात आले असून, त्यातच पर्यावरण मंत्रालयाने तसेच न्यायालयाने सुचविलेल्या शिफारशींचा विचार करता वाळू ठिय्यांचा लिलाव घेवून त्याची अधिकृत विक्री करणाºया ठेकेदारांनी यापुर्वीच या व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देबाजारात टंचाई : शासकीय कामे संकटातवाळू वाहतुकीवर आकारण्यात येणार लाखो रूपयांचा दंड

नाशिक : शासनाचे नवीन वाळू धोरण, बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर आकारण्यात येणारा लाखो रूपयांचा दंड व वाळू उपसावर उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे बाजारात वाळूची तिव्र टंचाई निर्माण झाली असून, अशातच शासकीय कामे मार्च अखेर पुर्ण करण्याचे ठेकेदारांवर बंधने लादल्यामुळे वाळूचे दर आकाशाला भिडले आहेत. आठ ते साडे आठ रूपये ब्रास या दराने पैसे मोजुनही वाळू मिळत नसल्याने शासकीय कामे संकटात सापडले आहेत.राज्य सरकारने दोन वर्षापुर्वी घोषित केलेल्या वाळू उपसा धोरणात नंतरच्या काळात अमुलाग्र बदल करण्यात आले असून, त्यातच पर्यावरण मंत्रालयाने तसेच न्यायालयाने सुचविलेल्या शिफारशींचा विचार करता वाळू ठिय्यांचा लिलाव घेवून त्याची अधिकृत विक्री करणा-या ठेकेदारांनी यापुर्वीच या व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून अनेक ठिय्यांचा लिलाव घेण्यास कोणी पुढे येत नाही. असे असतानाही शासनाने पुन्हा धोरणात बदल करून बेकायदा गौण खनिजाची वाहतूक करणा-यांना पाच पट दंड व गौणखनिजाचे स्वामीत्वधन आकारण्यास सुरूवात केली. नविन वर्षात पुन्हा एकदा अवैध वाळू उपसाला चाप लावण्यासाठी वाळू वाहतूक करणा-या वाहनांवरही लाखोंचा दंड ठोठावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अवैध वाळूची वाहतुकही गेल्या महिन्यापासून मंदावली असून, परिणामी बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक ठरणारी वाळू मिळणे दुरापास्त झाले आहे. नेमका त्याचाच फायदा वाळूचा साठा करून ठेवलेल्यांनी उचलण्यास सुरूवात केली आहे. साडेपाच हजार रूपये ब्रास मिळणारी वाळू कृत्रिम टंचाईमुळे साडेआठ हजार रूपये दरापर्यंत वाळूचे भाव वाढले आहेत मात्र इतका दर देवूनही वाळू मिळेलच याची कोणतीही शाश्वती मिळत नाही.वाळूच्या टंचाईचा फटका शासकीय कामांना बसत असून, बहुतांशी शासकीय बांधकामे पुर्ण करण्याची मुदत मार्च अखेर पर्यंत असून, वाळू मुळे गेल्या दोन महिन्यांपासून कामे बंद पडली आहेत. मध्यंतरी शासकीय ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून वाळू संदर्भात येणा-या अडचणीही कथन केल्या परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शासकीय कामे पुर्ण करण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक असून, केलेल्या कामांचे देयके ठेकेदारांना मार्च अखेरीसच अदा केली जातात. परंतु कामेच पुर्ण नसतील तर देयके कशी मिळणार असा प्रश्न ठेकेदार स्वत:लाच विचारू लागले आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक