शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

जिल्ह्यात २२५ अंगणवाडी नवीन इमारतींना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 01:08 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षातील आपले नियोजन पुर्ण केले असून, जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या सुमारे २१ कोटी रूपयांच्या निधीतून ग्रामीण भागातील आदिवासी व बिगर तालुक्यात २२५ अंगणवाड्यांसाठी नवीन इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती सभापती अश्विनी आहेर यांनी दिली आहे. 

नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षातील आपले नियोजन पुर्ण केले असून, जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या सुमारे २१ कोटी रूपयांच्या निधीतून ग्रामीण भागातील आदिवासी व बिगर तालुक्यात २२५ अंगणवाड्यांसाठी नवीन इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती सभापती अश्विनी आहेर यांनी दिली आहे. जिल्हा  नियोजन मंडळाकडून बिगर आदिवासी भागातील अंगणवाड्यांसाठी पाच कोटी ६१ लाख रूपये तर आदिवासी भागासाठी १४ कोटी ९४ लाख, ६० हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. त्याचे नियोजन करतांना महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्याच्या गटात एक अंगणवाडी मंजूर केली असून, आदिवासी भागातील अंगणवाडी बांधकामासाठी ९ लाख, ४० हजार व बिगर आदिवासी भागासाठी साडेआठ लाख रूपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. त्यानुसार २२५ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली असून, सभापती आहेर यांनी प्रत्येक सदस्याला पत्र पाठवून त्यांच्या तालुका व गटात मंजुर झालेल्या अंगणवाड्यांची यादी देखील दिली आहे. तालुकानिहाय मंजूर अंगणवाडीबागलाण- ३१, देवळा-०६, कळवण-१५, सुरगाणा-१८, पेठ-०२, दिंडोरी- १७, चांदवड-१२, त्र्यंबकेश्वर- ४०, इगतपुरी-४०, मालेगाव- ०६, नांदगाव-०५, येवला-१३, निफाड- ०९, नाशिक- ०२, इगतपुरी-०२, सिन्नर- ०७

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र