शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

नव्या व्याधींवर आयुर्वेदात प्रभावी औषधोपचार समीर जमदग्नी : ‘श्री विश्व’ राष्टÑीय परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:05 IST

माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे काळानुरूप व्याधीदेखील बदलल्या असून, नवनवीन आजार दररोज समोर येत आहेत. आयुर्वेदशास्त्र हे प्राचीन वैद्यकशास्त्र असून, यामध्ये सर्व नव्या व्याधींवर प्रभावी औषधोपचार उपलब्ध असून, त्यासाठी अभ्यास गरजेचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्य समीर जमदग्नी यांनी केले.

नाशिक : माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे काळानुरूप व्याधीदेखील बदलल्या असून, नवनवीन आजार दररोज समोर येत आहेत. आयुर्वेदशास्त्र हे प्राचीन वैद्यकशास्त्र असून, यामध्ये सर्व नव्या व्याधींवर प्रभावी औषधोपचार उपलब्ध असून, त्यासाठी अभ्यास गरजेचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्य समीर जमदग्नी यांनी केले.श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूरच्या वतीने महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये एकदिवसीय विश्व व्याख्यानमालेअंतर्गत आयुर्वेद आणि संशोधनपद्धती या विषयावर राष्टÑीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ट्रस्टचे आनंदनाथ महाराज चांगवडेकर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, डॉ. कैलास चव्हाण, डॉ. आशुतोष गुप्ता, वैद्य मीरा औरंगाबादकर, वैद्य प्रवीण जोशी, वैद्य अनिल बनसोड उपस्थित होते. यावेळी जमदग्नी यांनी ‘व्यावहारिक आयुर्वेद’ या विषयावर बोलताना सांगितले, आयुर्वेद उपचारपद्धतीसाठी ग्रंथांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. नव्या व्याधी जरी असल्या तर आयुर्वेदामध्ये उपचार उपलब्ध आहे. निसर्ग हा आयुर्वेदाचा मोठा आधार असून, औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात आहे, मात्र त्या ओळखून त्यांचा गुणधर्म जाणून घेण्यासाठी अभ्यासातून शोधकवृत्ती विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे. दरम्यान, औरंगाबादकर यांनी यावेळी पंचकर्म व त्वचारोग या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले, पंचकर्म ही आयुर्वेदामधील अत्यंत प्रभावी अशी त्वचाविकारासह पोटाच्या विकारावरील उपचारपद्धती आहे. पंचकर्म उपचार पद्धतीदरम्यान तसेच त्यानंतर पथ्यांचे पालन काटेकोरपणे महत्त्वाचे ठरते. पथ्ये पाळली नाही तर या उपचाराचा फायदा प्रभावी स्वरूपात जाणवत नाही. गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालय, सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसह राज्यभरातून सुमारे दीड हजार आयुर्वेदिक उपचार पद्धतीद्वारे प्रॅक्टीस करणारे डॉक्टर उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद मानधने, वैद्य मनीष जोशी यांनी केले.इन्फो—मंथन आयुर्वेदशास्त्र व उपचारपद्धतींवरपंचक र्म निदान, दोशा, स्थान, अवस्था, त्वचारोगसह विविध विषयांवर या परिसंवादामध्ये मंथन घडून आले. तज्ज्ञांनी उपस्थित आयुर्वेदशास्त्र शिकणाºया विद्यार्थ्यांसह डॉक्टरांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांमधून एम.डी.चे शिक्षण घेणाºया सुमारे ६८ विद्यार्थ्यांनी विविध संशोधनपर विषयांवर पेपर व पोस्टर प्रेझेंटेशनही सादर केले.दरम्यान, उत्कृष्ट सादरीकरण व संकल्पनांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.——फोटो आर वर १७वैद्य नावाने लोड :कॅप्शन : श्री विश्व व्याख्यानमालेप्रसंगी दीपप्रज्वलन करताना सद्गुरू आनंदनाथ महाराज. समवेत डावीकडून डॉ. मोहन खामगावकर, वैद्य प्रवीण जोशी, समीर जमदग्नी.