शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

समस्या सोडविण्याची समाजवादी पक्षाची मागणी

By admin | Updated: September 9, 2016 22:59 IST

समस्या सोडविण्याची समाजवादी पक्षाची मागणी

 सिन्नर : शहर व उपनगरातील पाणी समस्या, वीज भारनियमन, पालिका दवाखान्यातील समस्या आदिंसह पालिका हद्दीतील समस्या मार्गी लावून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष रंगा महादू सोनवणे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी उपनगरांमध्ये पाण्याची गंभीर स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी वीज भारनियमनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी निर्माण होत होती. पाणी सोडण्याची वेळ निश्चित नसल्याने अनेक कामगार व महिलांना कामावर जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी सोडण्याची वेळ निश्चित करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पालिका हद्दीतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गंगावेस भागातील शॉपिंग सेंटर समोरच्या रस्त्यावर अनेक दिवसांपासून खड्डे आहेत. त्यात अनेकदा अपघात होत असतात. सदर खड्डे बुजविण्यात यावे. पंचायत समिती ते म्हसोबा मंदिरापर्यंतचा रस्ता लवकर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रं. १ व ३, पालिका कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय आवारात गतिरोधक बसविण्यात यावे. अनेक दिवसांपासून शहरासह परिसरात विविध साथींच्या आजारांनी डोके वर काढले असून प्रत्येक आठवड्याला कीटकनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर रंगा सोनवणे यांच्यासह गंगाधर गुंजाळ, ज्ञानेश्वर फडवळ, ज्ञानेश्वर शिरोळे, दीपक जाधव, संजय गायकवाड, बाळू पवार यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)