शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम बांधवांचे सामुहिक नमाजपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 13:17 IST

शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले.

ठळक मुद्दे ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमनशहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाजपठण पारंपरिक पोशाखामध्ये आबालवृद्ध मैदानात जमले ‘तलाक’ इस्लामला मान्य नाही. तलाकची वेळ दांपत्यांनी येऊ देऊ नये.

नाशिक : शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. दरम्यान, धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले. त्यांनी ‘बकरी ईद व इस्लाम’ या विषयावर प्रकाश टाकला. सूर्यप्रकाश पडल्याने इदगाहच्या मुख्य नमाजपठणाच्या सोहळ्यावर असलेले पावसाचे सावट दुरू झाले. प्रवचनानंतर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाजपठणाला सुरूवात झाली. डोक्यावर हिरवा, पांढरा फेटा, पठाणी कुर्ता, इस्लामी टोपी अशा पारंपरिक पोशाखामध्ये आबालवृद्ध यावेळी मैदानात जमले होते. तत्पूर्वी मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारालगत तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेल्या नळांवरून समाजबांधव शुचिर्भूत (वजू) झाले.

इदगाह व सुन्नी मरकजी सिरत समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी उपस्थिताना ईद व इदगाहचे महत्त्व पटवून सांगत ‘तलाक’ इस्लामला मान्य नाही. तलाकची वेळ दांपत्यांनी येऊ देऊ नये, असे आवाहन केले. सव्वा दहा वाजता खतीब यांनी ध्वनिक्षेपकावर येत उपस्थिताना विशेष नमाजपठणाच्या पद्धतीची माहिती दिली आणि नमाजपठणाला सुरुवात झाली. उपस्थित हजारो समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने नमाज उत्साहात अदा केली

विश्वशांतीसाठी प्रार्थनासर्व मानवजातीसह भारत आणि विश्वाच्या कल्याणासाठी दुआ नमाजपठणानंतर खतीब यांनी विशेष दुआ केली. समाजातील सर्वच घटकांच्या विकासाबाबत खतीब यांनी दुआ मागितली. उपस्थितांनी त्यांच्या प्रार्थनेला ‘आमीन’ शब्द उच्चारत प्रतिसाद दिला. दरम्यान, भारतावर वक्रदृष्टी करणाºया दहशतवादी संघटना नेस्तनाबूत व्हाव्या आणि देशात अमन व शांती कायम नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. सर्वांनी उभे राहुन प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे सामुहिक पठण केले. नमाजपठणाचा सोहळ्याचा समारोप उत्साहात व शांततेत झाला.