शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
3
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
4
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
5
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
6
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
7
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
8
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
9
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
10
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
11
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
12
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
13
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
14
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
15
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
16
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
17
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
18
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
19
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
20
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?

देहविक्रीसाठी अल्पवयीन मुलींची विक्री

By admin | Updated: May 24, 2016 23:07 IST

आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश : महिला एजंटसह चौघे ताब्यात

पंचवटी : नाशिक शहरातील अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची परराज्यात चार ते पाच लाख रुपयांना विक्री करून जबरीने देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघा संशयिताना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमध्ये मल्हारखाण येथील महिला एजंटसह राजस्थानच्या तिघांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी संशयितांकडून कार ताब्यात घेतली असून संशयितांनी नाशिकच्या पाच मुलींची बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, कर्नाटक राज्यात विक्री केल्याची माहिती उजेडात आली आहे. पीडित मुलीच्या आईशी शिर्डीतील सुनीता गौराणे हल्ली राहणार मल्हारखाण हिने पाच वर्षांपूर्वी ओळख वाढवून तुमच्या मुलीसाठी स्थळ आहे, तिचा विवाह करायचा का असे सांगून पत्ता विचारून लुणकरण चोथमजी परमार या एजंटसह घर गाठले त्यानंतर मुलगा मुंबईला कामाला आहे असे सांगून दुसऱ्या दिवशी नाशिकरोड येथून त्या अल्पवयीन मुलीला रेल्वेने अहमदाबादला नेले. तेथे राजस्थानला राहणाऱ्या नितीन जैन (संघवी) याला दाखवून एका कार्यालयात विवाह लावून दिला व त्यानंतर संशयित गौराणे व परमार यांनी जैनकडून सुमारे पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर जैनने तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनीता गौराणे, छगनलाल जोधराज जैन, लुनकरण परमार यांना ताब्यात घेतले आहे.