शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

वावी येथे अंडरपास मिळण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:13 IST

--------------------- मोह शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी शिवारातील सर्व्हिस रोडवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची ...

---------------------

मोह शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी शिवारातील सर्व्हिस रोडवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलीसपाटील श्रावण गायकवाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. अंदाजे ४० ते ४५ वय असणारी सदर व्यक्ती मनोरुग्ण भिकारी असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शरीराने सडपातळ, रंगानो निमगोरा, चेहर उभट, नाक सरळ, कसे काळे व सफेद, दाढीचे केस वाढलेले, उंची १६५ सें. मी., गळ्याती तीन पदरी धागा अशा वर्णणाची व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली आहे. सदर वर्णनाच्या व्यक्तीची ओळख असल्यास एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--------------

सिन्नरच्या काळेमळ्यातून दुचाकीची चोरी

सिन्नर : येथील काळेमळ्यातून अज्ञात चोरट्यांनी बजाज पल्सर दुचाकी (एच.एच. १७ बी. जे. ७८६७) चोरून नेल्याची घटना घडली. अमोल तुकाराम भोसले (२५) या युवकाने त्याच्या मालकीची दुचाकी काळेमळ्यात घरासमोर लावली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुचाकी चोरून नेली. सकाळी सदर प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी मालकाने फिर्याद दिल्यानंतर सिन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात ुचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास रामदास धुमाळ करीत आहेत.

-----------------------

पांढुर्ली, साकूर उपकेंद्रांना स्वतंत्र वीजवाहिनी

सिन्नर : पांढुर्ली व साकूर उपकेंद्रांना स्वतंत्र वीजवाहिनी जोडण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. या वीज वाहिन्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्या. खापराळे येथील १३२ केव्ही केंद्रावरून पांढुर्ली व साकूर उपकेंद्राच्या ३३ केव्ही वाहिनी टाकण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील विजेच्या समस्या दूर होणार आहे.