शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची समजूत काढण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:05 IST

नाशिक : गेल्या आठवड्यात रस्ते विकास महामंडळाच्या झालेल्या बैठकीत समृद्धी महामार्गात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता शिवसेनेने या मार्गात बदल करण्याच्या केलेल्या सूचनेचा विचार करून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सिन्नर व इगतपुरी तालुक्याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यातून फक्त सेनेची समजूत काढण्याचाच प्रयत्न केला जाणार असून, गेल्या आठवड्यात रस्ते विकास महामंडळाच्या झालेल्या बैठकीत समृद्धी महामार्गात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी प्रशासकीय पातळीवर हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात असले तरी, या प्रकल्पाला जागोजागी होणारा शेतकऱ्यांचा विरोध तसेच राजकीय पक्षांच्या भूमिकेचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. विशेष करून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने समृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी न देण्याची भूमिका घेतल्यामुळे बागायतदार शेतकरी अद्यापही जागा देण्यास पुढे येत नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचविण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या मार्गात बदल करण्याची सूचना मध्यंतरी राज्य सरकारला केली होती व त्यासाठी काही नकाशेही राज्य रस्ते विकास महामंडळाला सादर केले होते. विशेष करून नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी येथील शेतकऱ्यांचा असलेला विरोध लक्षात घेता इगतपुरी तालुक्यातील फागुलगव्हाण, सायाळे या डोंगरमाथ्यावरून नवीन मार्ग शिवसेना कार्याध्यक्षांनी सुचविला आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात मुंबईत रस्ते विकास महामंडळाची बैठक होऊन त्यात ठाकरे यांनी सुचविलेल्या मार्गाची व्यावहारिकता तपासून पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, प्राथमिक पातळीवर ठाकरे यांनी सुचविलेला मार्ग पूर्णत: डोंगर-दऱ्यातून जात असून, त्यातून शेतकरी बाधित होणार नाहीत हे जरी खरे असले तरी, तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचे मत त्याच बैठकीत व्यक्त करण्यात आले, परंतु त्याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच बैठकीत रस्ते विकास महामंडळाने मात्र समृद्धी महामार्गाच्या नकाशात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे स्पष्ट करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष न देता मूळ मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही केल्या आहेत. शेतकऱ्यांकडून चौकशीसमृद्धी महामार्गासाठी दर जाहीर झाल्याने जमिनीची खरेदी दिल्यास गटनिहाय किती पैसे मिळतील याची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची समृद्धी कार्यालयात गर्दी होऊ लागली असून,येत्या आठवड्यात काही व्यवहार होण्याची शक्यता आहे.