शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

राज यांनी जाणल्या गारपीटग्रस्तांच्या व्यथा

By admin | Updated: December 15, 2014 01:33 IST

शेतकऱ्यांशी चर्चा : मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा करणार

नाशिक - अवकाळी पावसासह गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जिल्'ातील निफाड तालुक्यातील काही भागांचा दौरा करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आत्महत्त्या हा काही पर्याय नसून त्याने प्रश्न सुटणार नाहीत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू, अशी ग्वाही यावेळी राज ठाकरे यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी रविवारी जिल्'ातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. निफाडकडे जाणाऱ्या रस्त्यात मध्येच थांबत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. सरकारकडे तुमचे गाऱ्हाणे मांडतो, असे आश्वासनही दिले. त्यानंतर राज ठाकरे यांनी धारणगाव येथील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुई येथे राज ठाकरे गेल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना गराडा घातला. रुई गावातील शेतकऱ्यांनी तर चिता रचत त्यावर बसून संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले, आजवर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या; परंतु प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा पर्याय स्वीकारू नये. आता शेतकऱ्यांना लढा देण्याची नव्हे तर धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. पंचनामे होतात किंवा नाही, नुकसानभरपाई मिळते की नाही, याबाबत मनसेचे पथक माहिती घेत राहील. शेतकऱ्यांनी आत्महत्त्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, अशी कळकळीची विनंतीही राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केली. राज यांनी नंतर देवगाव येथेही भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. राज यांच्यासोबत माजी आमदार उत्तमराव ढिकले, नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले, राजाभाऊ डोखळे, डॉ. प्रदीप पवार, संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर आदि उपस्थित होत्