शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वादळवाराच ठरविणार साधुग्रामचा दर्जा?

By admin | Updated: June 18, 2015 00:07 IST

त्र्यंबकेश्वर : साधुग्रामचे काम रामभरोसे सुरू; पावसाळा असूनही प्रशासन मात्र निश्चिंत

नाशिक : येथील साधुग्रामच्या कामांचा दर्जा कोणतीही यंत्रणा अथवा समिती ठरविणार नाही, तर पाऊस आणि वादळवाऱ्यात होणाऱ्या नुकसानीनंतर येथील कामाच्या दर्जाविषयी बोलता येईल, असा पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पावसामुळे नाशिकच्या साधुग्रामची दैना झाल्याचा अनुभव असतानाही त्र्यंबकेश्वरच्या साधुग्रामची कामे नाशिकप्रमाणेच सुरू आहे. विशेष म्हणजे येथील साधू-महंतांकडूनही कोणतीच हरकत घेण्यात आली नसून, दर्जाबाबत त्यांनीही मौन बाळगल्याने ऐन पावसाळ्यात जिल्हा प्रशासनाची धावपळ उडण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे नाशिकमधील साधुग्रामची दैना झाल्याचा अनुभव असतानाही त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामच्या कामाबाबत जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचे समजते. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे येथील साधुग्राममध्ये बांधण्यात आलेल्या शौचालयांचे पत्रे उडून गेले होते. अनेक शेड्स कोलमडून पडले होते तर ठिकठिकाणचा मुरूम वाहून गेल्याने पाण्याचे डबके साचले होते. या पावसातच केलेल्या कामांचा दर्जा उघड झाल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. वास्तविक नाशिकपेक्षा त्र्यंबकेश्वरला पावसाची कृपा जास्त असते. पावसाळ्यात सातत्याने पावसाच्या सरी कोसळत असतात. डोगर कड्यांनी व्यापलेल्या त्र्यंबकेश्वरला पावसाबरोबरच वाराही वाहत असतो. अशा वातावरणात येथील साधुग्रामची कामे मजबूत होणे अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने कामे केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नाशिकच्या कामांबाबतही असेच बोलले जात होते. परंतु एकाच पावसात कामांचा दर्जा उघड झाला होता. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामच्या कामांच्या दर्जाबाबत अधिक काम करता येणे शक्य असताना प्रशासनाकडून मात्र फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याचे दिसते. पाऊस आणि वाऱ्यात साधुग्राम आणि तंबूंची काय अवस्था होते, यावरून येथील कामांचे मूल्यमापन ठरविण्याचा अजब फंडा प्रशासनाचा आहे.