शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राम स्वच्छता ठेका, २४ला सुनावणी

By admin | Updated: August 18, 2015 00:14 IST

साधुग्राम स्वच्छता ठेका, २४ला सुनावणी

नाशिक : साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात महापालिकेकडून प्रतिज्ञापत्र सादर न झाल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी येत्या २४ आॅगस्टला ठेवली आहे. दरम्यान, सुनावणीच्या दिवसांपर्यंत महापालिकेकडून प्रतिज्ञापत्राबाबत घोळ सुरूच असल्याने प्रशासनाकडून एकूणच वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.साधुग्राम स्वच्छतेचा ठेका वॉटरग्रेस कंपनीला न देता द्वितीय न्यूनतम निविदाधारक क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीला देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता. या निर्णयाविरुद्ध वॉटर ग्रेस कंपनीने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून, न्यायालयाने सोमवारी महापालिकेला आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, स्थायी समितीच्या सूचनेवरून महापालिकेने या दाव्यासाठी नवीन वकील विवेक साळुंके यांची नेमणूक केली. गेल्या शनिवारी आरोग्याधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्राचा नमुना तयार करून तो वकिलाकडे रवाना केला; परंतु सोमवारी सुनावणीच्या वेळेपर्यंत प्रतिज्ञापत्राबाबत अंतिम निर्णय न होऊ शकल्याने महापालिकेला न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी महापालिकेला २४ आॅगस्टपर्यंत मुदत दिली आहे. महापालिकेने आपल्या प्रतिज्ञापत्रात साधुग्राम स्वच्छतेची पर्याय व्यवस्था करण्यात आली असून, उच्च न्यायालय जो निर्णय देईल तो अंमलात आणला जाईल, असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)