शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश पवित्र ना, मग इतरही पशुहत्त्या करू नका

By admin | Updated: August 3, 2015 23:16 IST

! ‘पेटा’चे आवाहन : कुंभमेळ्यातील भाविकांसाठी लावले फलक

नाशिक : गाय पवित्र असल्याने ज्याप्रमाणे गायींची हत्त्या केली जात नाही आणि मांसाहार केला जात नाही, त्याप्रमाणे कोंबडी आणि अन्य प्राण्यांची मांसाहारासाठी हत्त्या कशासाठी करता, असा प्रश्न पेटा या प्राणिमित्र संघटनेने केला असून, कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना मांसाहार टाळा, असे आवाहन करणारे फलक ठिकठिकाणी लावण्यास प्रारंभ केला आहे.कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये लाखो भाविक येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पीपल फॉर द इथिकल ट्रिटमेंट आॅफ अ‍ॅनिमल्स पेटाने जनजागृतीचे अभियान सुरू केले आहे आणि मांसाहारासाठी पशुहत्त्या करू नका, असे आवाहन केले आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. हिंदू गायींना पवित्र मानत असल्याने गायींना ठार मारणे पाप मानले जाते. मग इतर प्राण्यांकडे त्याच भावनेने बघून त्यांचे भक्षण करणेही थांबवायला हवे, असे आवाहन पेटाने केले आहे. कोंबड्यादेखील गायींना त्यांच्या पिल्लांसाठी जागरूक आणि छळाप्रती संवेदनशील असतात. तरीही त्यांंना अगदी निर्दयपणे ठार मारले जाते, असे पेटाच्या आहारतज्ज्ञ भुवनेश्वरी यांनी म्हटले आहे. मांसाहारासाठी कोंबड्यांचा वापर करणारे कारखाने कोंबड्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवतात. तेथील उग्रवासात त्यांना राहावे लागते. इतकेच नव्हे तर या प्राण्यांना मारण्यासाठी वाहनातून नेले जाते. तेथे गुदमरून किंवा इजा होऊन अनेक कोंबड्या मरतात. अशाच प्रकारे शेळ्या आणि मासेही निर्दयपणे मारले जातात, असे पेटाचे म्हणणे आहे.शाकाहार करणारा मांसाहाराच्या तुलनेत अधिक तंदुरुस्त असतो. शाकाहार करणाऱ्याला हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि अन्य आजार होण्याची शक्यता कमीच असते. भारतात हे सर्व मोठे आजार सर्वाधिक असल्यामुळे शाकाहारी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)