शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण आरोग्य मृत्युशय्येवर

By admin | Updated: September 28, 2016 00:07 IST

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती

नाशिक : खोकला आणि थंडी-तापाची साथ असताना ग्रामीण भागात औषधे मिळत नाहीत. गर्भवती महिलांना दिलेले लाखो रुपयांचे धनादेश न वटताच परत गेले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेची महत्त्वाची औषधेच दीड महिन्यापासून नाहीत. अशा अनेक अडचणींमुळे ग्रामीण जनतेचे आरोग्य वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांना धारेवर धरले. याप्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषी असल्यास डॉ. सुशील वाकचौरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी दिले.या सर्व प्रकरणांवर लोकमतने मागील काही दिवसांत प्रकाश टाकत आरोग्य विभागातील अनागोंदी कारभार उघड केला होता. मागच्याच महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत वैद्यकीय अधिकारी रजा मंजुरी घोटाळ्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यावरही कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.शैलेश सूर्यवंशी व डॉ. भारती पवार यांनी या विषयाच्या चर्चेला सुरुवात केली. ग्रामीण भागात खोकल्यासह अन्य कोणतीच औषधे नसल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला. तर कुटुंब कल्याण कार्यक्रमासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत महिला व पुरुषांच्या शस्त्रक्रियेसाठी बीटासनसह अन्य औषधेच उपलब्ध नसल्याचा आरोप डॉ. भारती पवार यांनी केला. शरद माळी यांनी आपण आरोग्य समितीचे सदस्य असून, बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देतात. आमचे शिपाईही ऐकत नाही, असे सांगताना यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी सूचना केली. प्रशांत देवरे यांनी सक्तीच्या रजेवर पाठविण्याऐवजी त्यांच्याकडून काम करून घ्यावे, असे सांगितले. डॉ. सुशील वाकचौरे यांनी खोकल्याची औषधे नसल्याचे मान्य करत औषध खरेदीला तांत्रिक मान्यता शासन स्तरावरून होत असल्याचे सांगितले. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)