शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाच हजारांनी संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात ...

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली असून, गेल्या तेरा दिवसांतच जवळपास सव्वापाच हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांची तपासणी वाढवूनदेखील बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावागावात केलेले प्रयत्न व ग्रामस्थांनीही केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे हॉटस्पॉट ठरलेले नाशिक, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, निफाड व देवळा या तालुक्यांमध्येदेखील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली असून, निफाड व नाशिक तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र, अजूनही कोरोना ठाण मांडून बसला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाशिक शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. विशेष करून नाशिक शहराशी व्यापार, व्यवसाय व नोकरी धंद्यानिमित्त संबंध येणाऱ्या लगतच्या सिन्नर, निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. परिणामी रुग्ण संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याबरोबरच सोयी, सुविधांचीही वाणवा जाणवली. नाशिक शहरात बेड कमी पडू लागल्याने ग्रामीणचे रुग्ण दाखल करण्यासाठी वणवण भटकावे लागले. त्यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ग्रामीण भागात काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, गावांनीही पुढाकार घेत स्वयंस्फूर्तीने गावे बंद ठेवली. तसेच बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना संशयित रुग्णांची तपासणी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला. तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात हलविले. याचा सर्व एकत्रित परिणाम गेल्या काही दिवसांत जाणवू लागला असून, त्यातूनच १ मेच्या तुलनेत १३ मे रोजी रुग्णांची संख्या जवळपास ५३८० ने कमी झाली आहे.

---------------

नऊ टक्क्यांनी दर घसरला

१ मे रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १६३७७ रुग्ण होते. त्यावेळी करण्यात आलेल्या एका दिवसाच्या ५२०६ संशयित रुग्णांच्या चाचणीत कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाण १५०३ म्हणजेच पॉझिटिव्हीटी दर २८.८७ इतका होता. गेल्या बारा दिवसांत हेच प्रमाण आता कमी झाले असून, १३ मे रोजी जिल्ह्यात १०,९९७ इतके रुग्ण असून, ५५६७ संशयित रुग्णांच्या तपासणीतून १०९७ रुग्ण बाधित सापडले आहेत, पॉझिटिव्हीटी दर १९.७१ इतक्या खाली आला आहे.

---------

तालुकानिहाय १ ते १३ मे रोजी सापडलेले रुग्ण

१) नाशिक - २३५२ (२१९९)

२) चांदवड - १३३६ (८१८)

३) सिन्नर - १९१७ (१४३२)

४) दिंडोरी - १३३३ (९७६)

५) निफाड - २५५३ (१३२१)

६) देवळा- ११४२ (६९३)

७) नांदगाव - ५२० (५५१)

८) येवला - ६७४ (२९६)

९) त्र्यंबक - ३५३ (१९०)

१०) सुरगाणा - ४४२ (३१९)

११) पेठ -१४९ (९८)

१२) कळवण - ८०७ (६०२)

१३) बागलाण - १६५८ (७८९)

१४) इगतपुरी - ३४० (२९५)

१५) मालेगाव - ८०१ (४१८)