शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी वाहनचालकांची वेतनासाठी धावपळ

By admin | Updated: September 16, 2015 23:16 IST

कंत्राटी वाहनचालकांची वेतनासाठी धावपळ

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी वाहन चालकांची मानधनावर भरती करण्यात आली असून या कंत्राटी वाहनचालकांना गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांनी बुधवारी (दि. १६) जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांची भेट घेऊन वेतन तत्काळ मिळण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही केले आहे. या कंत्राटी वाहनचालकांची भरती बीव्हीजी व लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था या कंपनीमार्फत करण्यात आली आहे. या कंत्राटी वाहनचालकांची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरविण्यात येते. लोकसेवामार्फत मानधन १० हजार ६९५ रुपये व बीव्हीजीमार्फत १४ हजार ६२५ रुपये न देता बीव्हीजीतर्फे ६००० रुपये देण्यात येतात. तर लोकसेवामार्फत ६५०० रुपये देण्यात येतात. शासन पातळीवरून निघणारे अनुदानच या कंत्राटी वाहनाचालकांना देण्यात यावे,अशी मागणी या कंत्राटी वाहनचालकांनी केली आहे. कंंत्राटी वाहनचालकांसोबत सीटूचे राजू देसले होते. या शिष्टमंडळाने सुरुवातीला अध्यक्ष विजयश्री चुंभळे व नंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. (प्रतिनिधी)