कोट-
कारखाना कोण चालविण्यास घेत हे महत्त्वाचे नाही, तर कारखाना सुरू होणे महत्त्वाचे आहे. चार तालुक्यांचे वैभव असलेला हा कारखाना बंद पडल्यानंतर येथील शेतकरी अडचणीत आले आहेत. जो कुणी चालू करत असेल त्याला सर्वांनी एकदिलाने साथ द्यायला हवी. शेतकऱ्यांबरोबरच अनेक कामगारांचे पैसे अडकलेले आहेत, त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा आणि कारखाना सुरू करा. - बबन कांगणे, दोनवाडे
कोट-
बाहेरचे कारखाने आताच ऊस न्यायला नकार देत आहेत. निफाड कारखाना बंद आहे, काही कारखाने शेवटच्या टप्प्यात तोडणी करतात. त्यासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी केली जाते. यासाठी आपला कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. फक्त सुरू होताना तो चांगल्या माणसांच्या हाती जावा, एवढीच अपेक्षा आहे. - उत्तमराव सहाणे, साकूर
कोट-
नासाका बंद झाल्याने उसाचे क्षेत्र घटून भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे; पण भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना ऊस परवडतो. उसासाठी ५० टक्के क्षेत्र गेले तरी चालते. त्यातून शेतकऱ्यांच्या हाती एकरकमी दोन पैसे मिळतात. कोण चालवायला घेतो हे महत्त्वाचे नाही तर कारखाना चालू होणे महत्त्वाचे आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता जे विरोध करतात त्यांनी सक्षम पर्याय तरी द्यावा कारण चार तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवन यावर अवलंबून आहे. - बाळासाहेब कासार, भगूर, दे.कॅम्प
कोट-
इगतपुरी तालुक्यातून आजही इतर कारखान्यांना सुमारे एक लाख मेट्रिक टन ऊस जातो; पण आता या कारखान्यांकडूनच संदेश येऊ लागले आहेत. अजून तोडीला चार ते सहा महिने आहेत; पण आतापासूनच शेतकरी चिंतेत आहेत. यासाठी हक्काचा कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. कारखाना कुणीतरी चालविलाच पाहिजे, अगदी जिल्हा बँकेनेही कारखाना चालविला तरी सभासदांना चालणार आहे. - उल्हास जाधव, शेणीत
कोट-
माझा दोन एकर ऊस उभा आहे. बावीस महिन्यांचा हा ऊस कोण घेणार, असा प्रश्न मला पडला आहे. कारखाना सुरू होणे ही काळाची गरज आहे. कोण चालवतो याला महत्त्व नाही; पण कारखान्याची चाके फिरावीत, हीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. हक्काचा कारखाना असता तर ही स्थिती उद्भवली नसती - माणिक कासार, शेवगे