शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

नियम धाब्यावर : मागेल त्याला पदांची खैरात; जम्बो कार्यकारिणी झाली तयार

By admin | Updated: August 22, 2016 00:04 IST

भाजपात घटनाबाह्य पदांचा सुळसुळाट

नाशिक : घटनेप्रमाणे पक्षाची रचनाच कायम असल्याचा दावा करणाऱ्या भाजपात सध्या घटनाबाह्य पदांचा सुळसुळाट सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कनवाळू शहराध्यक्षांनी मागेल त्याला पदे देण्याचा सपाटा सुरू केला आहे. घटनेनेच पदांची संख्या मर्यादित ठेवली असताना आता जम्बो कार्यकारिणी तयार झाली आहे.भाजपात घटनेनुसार चालते, असा दावा या पक्षाच्या वतीने नेहमीच केला जातो. शहराध्यक्षाची निवड झाल्यानंतर पक्षातील अन्य पदाधिकारी नियुक्त करण्याचा त्यांना अधिकार असतात. त्यानुसार सर्वसंमतीने आणि सामाजिक तसेच भौगोलिक समतोल साधून पदाधिकारी नियुक्त केले जातात. नाशिकमध्येही अशा प्रकारे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी कार्यकारिणी घोषित केली. मात्र, नंतर एकेक पद नियुक्तीचा सपाटा सुरू केल्याने मूळ पदांवर काम करणाऱ्यांना काही अर्थच उरला नाही. उपाध्यक्षपदासाठी एकूण आठ पदे आहेत. मात्र, त्यात शहराध्यक्षांनी गिरीश पालवे, प्रकाश घुगे, दिनकर पाटील, श्रीमती पुष्पा शर्मा, भारती बागुल अशी पाच पदे वाढविली आहेत. त्यामुळे एकूण आठ ऐवजी तेरा उपाध्यक्ष झाले आहेत. सरचिटणीसपदाची चारच पदे मंजूर असताना अध्यक्षांनी काशीनाथ शिलेदार यांना अतिरिक्त नियुक्त केल्याने एकूण ५ सरचिटणिसांची संख्या पूर्णांकात गेली आहे. चिटणीसपदांची मंजूर संख्या आठ असताना तेथे आणखी पाच जणांची भरती करण्यात आली आहे. यात गुलाब सय्यद, श्याम पिंपरकर, राजेंद्र संगमनेरकर, राजश्री शौचे, अजित ताडगे यांची वर्णी लावण्यात आली आहे. याशिवाय अनेक आघाड्यांमध्येही भर घालण्यात आली आहे. त्यानुसार ग्राहक मंच, वाहतूक समस्या, गुजराथी सेल, क्रीडा आघाडी, व्यापार आघाडी, प्रज्ञावंत आघाडी, तीर्थ क्षेत्र आघाडी, अपंग आघाडी, बारा बलुतेदार आघाडी, ज्येष्ठ कार्यकर्ता मंच अशा अनेक नव्या आघाड्या तयार करण्यात आल्या आहेत. पक्षात घटनामान्य पदे असताना त्यापेक्षा अतिरिक्तपदांचे कोणतेही महत्त्व नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर गोतावळा जमा करण्यात आला असला तरी संबंधितांना मिरवण्याखेरीज पदांना महत्त्व नाही. पक्षातील कथित निष्ठावान, जुने ज्येष्ठ, प्रदेश पातळीवर काम करणारे सारचे मूग गिळून बसल्याने सामान्य कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत. (प्रतिनिधी)