शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी

By admin | Updated: September 3, 2014 00:44 IST

विसर्जन मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी

नाशिक : सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांमार्फत वापरल्या जाणाऱ्या वाहनांची यांत्रिक तपासणी आरटीओकडून केली जाणार असून, तपासणीसाठी आरटीओने दि. ६ व ७ सप्टेंबर रोजी कार्यालयीन वेळेत स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली आहे.गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून देखावे आणि मूर्तींसाठी वाहने वापरली जातात. मिरवणुकीत ऐन गर्दीच्या प्रसंगी वाहने नादुरुस्त होणार नाहीत आणि कोणतीही दुर्घटना घडणार नाही, यासाठी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी आपल्या वाहनांची आरटीओकडून यांत्रिक तपासणी करून तसे प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. आरटीओने दि. ६ व ७ सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत वाहन तपासणीकरिता स्वतंत्र सुविधा प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे. वाहनधारकांनी सकाळी १० ते ५ या वेळेत पेठरोड येथील कार्यालयात वाहनाची यांत्रिक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. वाहन तपासणीसाठी आणताना वाहनांची कागदपत्रेही सोबत आणण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दि. ५ सप्टेंबर रोजी येवला येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे शिबिर असून, त्याठिकाणीही तालुक्यातील वाहनांची यांत्रिक तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)