शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

देना बँकेत ६२ लाखांचा अपहार

By admin | Updated: August 13, 2016 00:11 IST

मनमाड : बॅँक अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

मनमाड : शहरातील देना बॅँक या राष्ट्रीयीकृत बँकेत मयत पेन्शनधारकाच्या खोट्या स्वाक्षऱ्या व कागदपत्रे तयार करून तब्बल ६२ लाख रुपयांचा अपहार झाला असल्याची फिर्याद मनमाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन बँक अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील देना बॅँकेचे व्यवस्थापक विनीत रमेशचंद्र कपूर, रा.कीर्तन सोसायटी, मातोश्रीनगर, नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माहे जून २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीमध्ये बॅँकेचे तत्कालीन दोन अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांनी आपापसात संगनमत करून मनमाड देना बॅँकेतील १५ पेन्शनधारक व १ कर्ज खातेधारक यांच्या खात्यातून स्वत:चे यूजर आयडी क्रमांकाचा गैरमार्गाने उपयोग करून त्याद्वारे पेन्शनधारक व कर्जधारकाच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी बनावट व खोटे दस्तऐवज तयार केले. त्याद्वारे एटीएम कार्ड देऊन पेन्शनधारक मयत झालेले असताना स्लिपवर खोट्या सह्या करून वेळोवेळी मनमाड व शिर्डी येथील एटीएममधून रक्कम काढून ६१ लाख ७४ हजार ९८० रुपयांचा अपहार करून बॅँकेची व खातेधारकांची फसवणूक केली. या प्रकरणी बॅँक अधिकारी ओमीकुमार, मनीष मित्तल, सिंगल विंडो आॅपरेटर हर्षल चापके, कीर्ती शर्मा, एटीएम सुरक्षा रक्षक दशरथ दराडे यांच्या विरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(वार्ताहर)