शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांनी वसूल केलेले साडेचार कोटी रुपये रुग्णांना केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST

कोरोनाकाळात उपचार करताना बिलेदेखील मर्यादित राहावीत आणि उपचारासाठी दाखल रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांकडून अवास्तव दर आकारणी होऊ नये यासाठी ...

कोरोनाकाळात उपचार करताना बिलेदेखील मर्यादित राहावीत आणि उपचारासाठी दाखल रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांकडून अवास्तव दर आकारणी होऊ नये यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षापासूनच खासगी रुग्णालयांमध्ये ऑडिटर नियुक्त केले आहेत. त्यांनी बिले तपासूनच रुग्णांच्या नातेवाइकांना देण्याचे आदेश आहेत. मात्र, त्यानंतर महापालिकेने सर्वच खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट स्वत:च करून तक्रार असो वा नसो; परंतु शासनाच्या आदेशानुसार बिल आकारले जाते किंवा नाही हे तपासून ज्यादा बिल आकारले गेल्यास ते पुन्हा रुग्णांच्या नातेवाइकांना परत मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली आहे.

गेल्या ८ एप्रिलपर्यंत कोविड रुग्णालयातून उपचार घेऊन बरे झालेल्या ४२ हजार ७०८ रुग्णांना खासगी रुग्णालयातून सोडण्यात आले. महापालिकेच्या लेखापरीक्षकांनी १६ हजार ८०२ इतक्या बिलांची तपासणी केली. यात शासन दरापेक्षा चार कोटी ३० लाख १५ हजार ८७२ रुपये इतकी रक्कम अधिक आकारली गेल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम बिलांतून कमी करण्यात आली. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची ही रक्कम वाचली आहे. उर्वरित २५ हजार ९०६ ही आरोग्य विम्याची देयके होती, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

इन्फो...

तीन महिन्यांत ३ हजार १९३ बिलांची तपासणी

चालू वर्षी जानेवारी ते ८ एप्रिल २०२१ पर्यंत ११ हजार ६३१ रुग्णांना खासगी रुग्णालयांतून उपचारानंतर घरी सोडण्यात आले. मनपाच्या लेखापरीक्षकांनी ३ हजार १९३ बिलांची तपासणी करून ६४ लाख १८ हजार ९२७ रुपये इतकी रक्कम खासगी रुग्णालयांनी अवाजवी आकारली होती. ती रक्कम देयकातून कमी करण्यात आली आहे.

इन्फो...

लाखाच्या खाली बिल येणे दुर्मीळच

शहरात असलेल्या खासगी रुग्णालयात कोरोना उपचाराचे सरासरी बिल एक लाखाच्या वरच असते, असे महापालिकेला आढळले असले तरी काही मोजक्याच रुग्णालयांबाबत तक्रारी आहेत. अनेक रुग्णालयांत लाखाच्या आतदेखील खर्च होतो आणि रुग्ण बरे होतात. काही डॉक्टर तर रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार न करता घरीच उपचार करीत असल्याचेदेखील आढळले आहे.

इन्फो..

आरोग्य विभागाकडून नाेटिसा

नाशिक महापालिकेच्या वतीने बिलांची तपासणी केल्यानंतर संबंधित रुग्णालयाने जर आकारलेले वाढीव बिल रुग्णांच्या नातेवाइकांना परत केले नाही, तर महापालिका नोटिसा बजावते आणि यानंतरही रक्कम परत दिली नाही, तर गुन्हा दाखल करण्यात येतो. आतापर्यंत अनेक रुग्णालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या असल्या तरी एका रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोट..

शहरातील कोविड रुग्णालयात दाखल ऑडिट नियमित केले जाते. मनपाबरोबरच सहकार खाते आणि लोकल फंडाच्या लेखापरीक्षकांचीदेखील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, लोकल फंड ऑडिटच्या लेखापरीक्षकांना अन्य कामे आल्याने सध्या १३२ पैकी १०८ रुग्णालयांवर लेखापरीक्षकांची नजर आहे. लवकरच अन्य लेखापरीक्षक नियुक्त करण्यात येणार आहे.

-बी.जी. सोनकांबळे, मुख्य लेखापरीक्षक, महापालिका

इन्फो...

शहरातील एकूण खासगी कोविड रुग्णालये १३२

बिलांची ऑडिट झालेली रुग्णालये १०८