शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सहाशे दारू दुकानांवर गंडांतर

By admin | Updated: March 10, 2017 01:53 IST

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य मार्गावरील पाचशे मीटर अंतराच्या आतील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णयाने जिल्ह्यातील सहाशे दुकानांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली

 नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य मार्गावरील पाचशे मीटर अंतराच्या आतील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय देऊन त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्याच्या केलेल्या सूचनेबर हुकूम जिल्ह्यातील अकराशेपैकी सहाशे दुकानांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यासमवेत राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून अशा दुकानांचा शोध घेऊन त्यांची मोजणी सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेची सुनावणी करताना या संदर्भातील आदेश जारी केला आहे. राष्ट्रीय व राज्य मार्गावर दरवर्षी वाढत जाणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करीत न्यायालयाने बहुतांशी अपघात हे चालकाच्या नशेमुळे होत असल्याचे निरीक्षण नोंदविले होते व त्यासाठी जबाबदार असलेले राष्ट्रीय व राज्य मार्गावर पाचशे मीटर अंतराच्या आतील मद्यविक्रीचे दुकानांचे परवाने १ एप्रिलनंतर नूतनीकरण न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. न्यायालयाच्या या निर्णयावर मद्यविक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकाही दाखल करण्यात आली, परंतु न्यायालय आपल्या निर्णयावर कायम राहिले. न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अवघे वीस दिवस शिल्लक असून, आता या निर्णयाचा फेरविचार होणे शक्य नसल्याचे पाहून मद्यविक्रेत्यांनीही पर्याय शोधण्यास सुरुवात केली, त्याचप्रमाणे या आदेशाची अंमल बजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागानेदेखील राष्ट्रीय व राज्य मार्गावर असलेल्या मद्यविक्री दुकानांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)