शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

लूटमार करणाऱ्यास दोन तासांत अटक

By admin | Updated: May 15, 2017 01:27 IST

नाशिक : दोघा दुचाकीस्वारांना पाठीमागून येऊन एका दुचाकीस्वार चोरट्याने अडवून मारहाण करीत धारदार शस्त्राने धमकावून लूट केल्याची घटना उघडकीस आली होती.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंपिंगस्टेशन रस्त्यावरून जात असलेल्या दोघा दुचाकीस्वारांना पाठीमागून येऊन एका दुचाकीस्वार चोरट्याने अडवून मारहाण करीत धारदार शस्त्राने धमकावून लूट केल्याची घटना रविवारी (दि.१४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. यानंतर तत्काळ सरकारवाडा पोलिसांनी दोन पथके तयार करून साध्या वाहनातून शोध घेत संशयिताला कॉलेजरोड येथून संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अटक केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विसे चौक परिसरातून सोमेश्वरकडे दुचाकीने जाणारे गणेश विष्णू सरकाते व त्यांचा मित्र सुमित यांना दुचाकी (एमएच १५, डीएन ६९४२) आडवी लावून संशयित सारनाथ गणकवार (२८) याने सुमित याच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून धमकावत तीन मोबाइल, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, एक हजाराची रोकड लुटून पळ काढला. यावेळी दोघा मित्रांनी जुना गंगापूर नाक्याच्या सिग्नलपर्यंत त्याचा पाठलाग के ला, मात्र सिग्नल हिरवा झाल्याने ते पळून गेले आणि गणेश व सुमित सिग्नलवर येईपर्यंत सिग्नल पुन्हा लाल झाला. त्यामुळे त्या चोरट्याचा पुढे पाठलाग करता आला नाही. दोघांनी अधिक वेळ वाया न घालविता त्वरित सरकारवाडा पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी त्वरित एक पथक तयार केले आणि त्यांनी आपल्यासोबत साध्या वेशातील पोलीस कर्मचारी घेऊन खासगी वाहनाने तपास सुरू केला.