शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी रुपयांचे पुन्हा खोदणार रस्ते

By admin | Updated: July 3, 2017 00:31 IST

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक सुविधा देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक सुविधा देण्यात येणार असून, अशा सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे रस्ते खोदावे लागणार आहेत. सुमारे साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून संपूर्ण शहरात फायबर आॅप्टिकल केबलचे जाळे विणण्यासाठी हा प्रकार करावा लागणार आहे. सिंहस्थात दोन वर्षांपूर्वीच तयार करण्यात आलेले गुळगुळीत रस्ते खोदावे लागणार असल्याने पुन्हा हेच रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेलाही कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.नाशिक शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड झाल्यानंतर नूतनीकरणाच्या काही कामांना स्पेशल परपज व्हेईकल कंपनीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता कामे सुरू होत असली तरी मुख्य काम शहराला तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्ट करायचे असल्याने नाशिक शहरात फायबर आॅप्टिकल केबलचे जाळे विणावे लागणार आहे. अशाप्रकारचे फायबर आॅप्टिकल केबलचे जाळे संपूर्ण शहरभर विणल्यानंतर त्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी हे खोदकाम केले जाणार आहे. राज्य शासनाने स्मार्ट सिटीअंतर्गत अशाप्रकारच्या सेवा देण्यासाठी राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ कामकाज करीत असून, त्याअंतर्गत नाशिकमध्ये साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून हे काम करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये यापूर्वीच अशाप्रकारचे काम झाले असून, त्यानंतर आता नाशिकमध्ये असेच काम करण्यात येणार आहे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विजय गौतम यांच्या उपस्थितीत नाशिकला प्राथमिक बैठकही झाली आहे. नाशिकमध्ये यापूर्वी २०१२-१३ मध्ये रिलायन्स कंपनीने अशाप्रकारे फायबर आॅप्टिकल टाकण्यासाठी खोदकाम केले होते.