शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खणणाऱ्या ठेकेदाराला अभय

By admin | Updated: September 5, 2015 00:10 IST

बॅरिकेडिंगमुळे खड्डे : स्थानिकांवर कायद्याचा बडगा

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी मंडप वा रस्त्यावर खड्डा खणल्यास पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद करण्याचे धोरण स्वीकारणाऱ्या महापालिका प्रशासनाने मात्र कुंभमेळ्याच्या निमित्ताने पोलिसांनी सांगितल्यानुसार भर रस्त्यावर खड्डे खणून बॅरिकेडिंग करणाऱ्या ठेकेदारावर आपली मेहेरनजर कायम ठेवल्याने नुकतेच नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्यांची चाळण झाली आहे.कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या दिवशी पोलिसांनी ठेका दिलेल्या बॅरिकेडिंग ठेकेदाराने शहराच्या चहुबाजंूनी बल्ली-बॅरिकेडिंगने मुसक्या आवळताना महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे खणून रस्ते बंद केले. या बॅरिकेडिंगमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला हा भाग वेगळा असला तरी, प्रत्यक्षात बॅरिकेडिंग काढल्यानंतर ठेकेदाराने केलेले खड्डे मात्र अद्यापही तसेच आहेत. महापालिकेने कुंभमेळ्यानिमित्त शेकडो कोटी रुपये खर्च करून शहरातील अंतर्गत व बाह्य रस्त्यांचे बळकटीकरण केले आहे. आता तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची भविष्यात आर्थिक कारणास्तव डागडुजी होण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे सध्या तयार रस्त्यांची अधिकाधिक काळजी घेणे एवढेच महापालिकेच्या हाती आहे. परंतु पहिल्या पर्वणीला बॅरिकेडिंग करणाऱ्या ठेकेदाराने अनेक रस्त्यांवर खड्डे खणून केलेल्या बॅरिकेडिंगमुळे रस्त्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रस्त्यावर मंडप उभारणारे तसेच खड्डे खणण्याबाबत नाशिक महापालिकेने धोरण ठरविले असून, रस्त्यावर एक खड्डा खणल्यास थेट ५० हजार रुपये दंडाची तरतूद त्यात करण्यात आलेली आहे. होऊ घातलेल्या गणेशोत्सव सार्वजनिक मित्र मंडळाला महापालिकेकडून तशी स्पष्ट सूचनाही देण्यात आलेली असून, रस्त्याच्या तोडफोडीवर खास लक्षही ठेवण्यात येणार आहे. याच कारणास्तव महापालिकेने नवीन नळ कनेक्शन देताना रस्त्याची तोडफोड होते म्हणून परवानगी देण्यास नकार सुरू केला आहे. म्हणजे नाशिककरांना कायद्याचा बडगा दाखविण्याची तयारी करणाऱ्या महापालिकेने बल्ली बॅरिकेडिंग करणाऱ्या ठेकेदारावर आपली मेहेरनजर दाखविली असून, अगोदरच पोलिसांकडून बॅरिकेडिंगचा ठेका पदरात पाडून ठेकेदाराने चांगभलं केलेले असताना आता महापालिकाही त्याला अभय देत असल्याने जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)