कोट-
माझा दरवर्षी ८०० ते हजार टन ऊस जातो. भाव मिळत असला तरी सगळं परस्वाधीन असल्यासारखी स्थिती आहे. वेळेवर तोड होण्यासाठी नको त्या उपाययोजना कराव्या लागतात. दुष्काळात त्या कारखान्यांना गरज होती. आता सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने लागवड वाढली आहे यामुळे यावर्षी ऊस शिल्लक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- शिवाजीराव म्हस्के, चेहेडी
कोट-
आपला कारखाना बंद झाला तसा बाहेरच्या कारखान्याला ऊस जातो. पण ते सहजासहजी होत नाही. यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा मजुरांची पैशांची मागणी पूर्ण करावी लागते. मागीलवर्षी त्या कारखाने अडीच हजारांचा भाव दिला यावर्षी तर दरही कमी दिला आहे. ॲडव्हान्स नंतर काही मिळेल की नाही याचा काही अंदाज नाही.
- ज्ञानेश्वर गायधनी, पळसे
कोट-
आपला कारखाना सुरू होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करायला हवेत. दरवर्षी ५०० टन ऊस असतो तो जर नोंदणी केलेला असेल तर अडचणी येत नाहीत, पण नोंद केलेली नसेल तर चहापाण्याशिवाय पान हालत नाही अशी स्थिती आहे.
- मोहन गोसावी, नानेगाव
कोट-
सुरुवातीला आमचा ५०० ते ६०० टन ऊस कारखान्याला जायचा, पण कारखाना बंद झाल्यानंतर उसाचे क्षेत्र कमी केले आहे. तरी १५० ते २०० टन ऊस असते. आपण दुसऱ्या जिल्ह्यातील असल्यामुळे इतर कारखान्यांकडून होणार छळ सहन करावा लागतो. तेथील अधिकाऱ्यांना काही बोलण्याची सोय नाही. ते त्यांच्या मर्जीनुसार ऊस नेतात. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आज अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत. आश्वासन देऊनही मागील वर्षी आमचा ऊस गेला नाही शेवटी तो जनावरांच्या कुट्टीसाठी द्यावा लागला.
- कांतीलाल गायधनी, पळसे
कोट-
स्वत:चा ऊस असूनही आज शेतकऱ्यांना पायापडी करावी लागत आहे. अनेकवेळा बाहेरच्या कारखान्याचे ऊसतोड कामगार वेळेवर येत नाहीत. आज मजूर मिळत नाहीत घरात माणसं कमी यामुळे उसाशिवाय दुसरं पीक घेता येत नाही. ठोक पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते, पण त्यासाठी अनेक मोठ्या दिव्यातून जावे लागते.
- भाऊसाहेब गायकवाड, भगूर