शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वणी घाटात दरड कोसळली

By admin | Updated: September 18, 2015 22:44 IST

वणी घाटात दरड कोसळली

वणी : गुरुवारी मध्यरात्रीपासून वणी आणि परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून, यामुळे पहाटेच्या सुमारास सप्तशृंगगडावरील गणपती घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. परिणामी येथील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.मध्यरात्री दीडनंतर सुरू झालेल्या पावसाचा जोर आधी कमी होता मात्र नंतर वाढला. वणी, मुळाणे, बाबापूर, धरमबरडा, भातोडे, संगमनेर, कृष्णगाव, ओझरखेड, मावडी, तिसगाव, तळेगाव, खेडगाव, अंबानेर, पुणेगाव, पांडाणे, हस्ते माळे, कोशिंबे, करंजखेड येथे जोरदार पाऊस झाला. नद्या, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहु लागले. संगमनेर नदीला पूर आला असून, हे पाणी तिसगाव धरणात जात असल्याने धरणसाठ्यात तसेच ओझरखेड, पुणेगाव, करंजवण, पालखेड, एकलहरा तालुक्यातील धरणाच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे. भातोडे गावच्या देवनदीला पूर आल्याने या गावचा संपर्क तुटला तर गडावर रात्रभर सुरू असलेला वादळी पाऊस आणि धुके यामुळे नांदुरी ते गड १० किलोमीटरच्या अंतरात काही दिसेनासे झाले होते. एसटीमधून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्याही कमी होती.काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठयावर परिणाम झाला होता. काही कालावधीसाठी तरवणी शहराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे पाऊस गणपतीच्या सोंडेत अडकला असून पुढील नऊ दिवस पावसाची हजेरी राहिल असे भाकित जाणकारांकडुन वर्तविण्यात आले आहे.(वार्ताहर)