शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावकरांसाठी तांदूळ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:54 IST

‘कोरोना’सारख्या जीवघेण्या विषाणूने जिल्ह्यासह संपूर्ण देश व राज्यात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने मालेगावकरांसाठी दहा हजार किलो तांदळाची मदत करण्यात आली आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाचे एका टप्प्यातील काम करणाºया अ‍ॅफकॉन्स कंपनीचे सहकार्य लाभले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मालेगाव : ‘कोरोना’सारख्या जीवघेण्या विषाणूने जिल्ह्यासह संपूर्ण देश व राज्यात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने मालेगावकरांसाठी दहा हजार किलो तांदळाची मदत करण्यात आली आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाचे एका टप्प्यातील काम करणाºया अ‍ॅफकॉन्स कंपनीचे सहकार्य लाभले आहे.यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठलराव सोनवणे, अ‍ॅफकॉन्स कंपनीचे शेखर दास आदी उपस्थित होते.यावेळी मालेगावकरांना उद्देशून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले, नागरिकांच्या मूलभूत अडचणी सोडविण्यास स्थानिक प्रशासन कटिबद्ध आहे. मालेगाव तालुक्यात ‘कोरोना’बाधित एकही रुग्ण आजतागायत आढळून आलेला नाही. ही आनंदाची बाब आहे. याचे सर्व श्रेय स्थानिक प्रशासनासह संपूर्ण मालेगाव तालुक्यातील नागरिकांना जाते. तरी देखील काही भागात नागरिक अन्न व पाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांनी घराबाहेर पडणे हे केवळ आपल्याच नाही तर समाजातील इतरांच्याही जीवाशी खेळण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.आपत्ती काळात ज्या काही सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यांच्याशी समन्वय साधून मदत घेण्यात येत आहे. तर प्रशासनामार्फत प्रभावित झालेल्या गरजू लाभार्थी ज्यांना शासनाकडून कुठलाही लाभ मिळत नाही, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, हात मजुरी, शेतमजूर असे नागरिक ज्यांचे हातावर पोट आहे, अशा तळागाळातील लाभार्थींसाठी सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून दहा हजार किलो तांदूळ मालेगावकडे रवाना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न