शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

By admin | Updated: June 12, 2015 23:35 IST

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध विकासकामासंदर्भात आमदार निर्मला गावित यांनी आढावा बैठक घेतली.यावेळी प्रभारी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी प्रमिला जाखलेकर, उपअभियंता महेश पाटील, एल. बी. बोरोले, पालिका मुख्याधिकारी एम. एन. नागरे तसेच तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक विश्रामगृहावर आमदार गावित यांनी बोलविली होती.या बैठकीत सार्वजनिक बांधाकाम विभाग, त्र्यंबक नगरपालिका, त्र्यंबक तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, वन विभाग (अधिकारी अनुपस्थित) मात्र अकौंट विभागातील श्रीमती अनुजा हटकर यांनी जुजबी माहिती दिली. यावेळी अंजनेरी गटात बरीच कामे अपूर्ण असून संबंधित अधिकाऱ्याला त्याचा जाब विचारला तर ग्रामपंचायतीअंतर्गत अनेक कामे सुरू असून सर्व कामे अपूर्णावस्थेत आहे. या कामांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना केल्या.आरोग्य विभागाबद्दल अनेक तक्रारी असून कळमुस्ते, मेटघर आदि ठिकाणी कर्मचाऱ्यांना क्वार्टर बांधून दिले असले तरी ते मुख्यालयात राहत नाहीत. क्वार्टर्सचा वापर करीत नाही अशा कर्मचाऱ्यांचे वेतन रोखा, त्यांना मुख्यालयी राहात नाही, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मुख्यालयी राहावे, असे बजवावे अन्यथा वेतन थांबवावे, असेही सुनावले. यावेळी त्र्यंबक नगरपालिकेत चाललेल्या कामाविषयी त्यांनी माहिती घेतली. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे यांनी कामांच्या प्रगतीबाबत माहिती दिली. डॉ. लोंढे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाबाबत माहिती दिली. कृषी विभागातील खतांचे नियोजन करावयास हवे, खरीप हंगामाचे नियोजन केले असल्याचे तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी सांगितले. आजच्या आढावा बैठकीस पोलीस उपनिरीक्षक बेंडाळे, जिल्हा परिषद उपअभियंता व्हनमाने, कृ. अ. अजय सूर्यवंशी, पी. डी. जाधव, आर. एच. डोंगरे, भूमिअभिलेखचे बी. एच. खरे, दुय्यम निबंधक आर. बी. भालेराव, सहायक गटविकास अधिकारी संजय केदारे, बालविकास अधिकारी मोहन तुपे, पी. आर. महाजन (आरोग्य), व्ही. व्ही. इंगळे (इ.द.) शाखा अभियंता, उपकोषागारचे किशोर पाटील, आर. एच. डोंगरे (शा.अ.) आदि उपस्थित होते.