शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत महसूल अन‌् पोलीस खात्याची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST

नाशिक : महसूल व पोलीस खात्यात लाचखोरीचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून अनेकदा समोर येते. या दोन्ही खात्यांची लाचखोरीत आघाडी ...

नाशिक : महसूल व पोलीस खात्यात लाचखोरीचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून अनेकदा समोर येते. या दोन्ही खात्यांची लाचखोरीत आघाडी असल्याचे दिसून येते. मागील वर्षी जिल्ह्यात नऊ पोलीस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले तसेच यावर्षीही सातपूर पोलीस ठाण्यातील तीन लाचखोर पोलिसांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. महसूल खात्यात सात लाचखोरांना कारवाईला सामोरे जावे लागले होते.

सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची विविध कामांसाठी अडवणूक करत लोकसेवकांकडून सर्रासपणे लाच मागण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले दिसून येत नाही. उत्तर महाराष्ट्रात या वर्षभरात तब्बल १३३ लाचखोर लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ९ पोलीस, तर संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात एकूण २४ पोलिसांना विविध कारणांवरून तक्रारदारांकडे लाचेची मागणी करत रक्कम स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. तसेच नाशिक परिक्षेत्रात महसूल खात्यातील एकूण २६ कर्मचारी लाचेची रक्कम घेताना सापडले. या दोन खात्यांत सर्वाधिक ट्रॅप लागतात तरीदेखील या खात्यांमध्ये लाच मागण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

---इन्फो--

जिल्हानिहाय सापळा कारवाई अशी....

जिल्हे - २०१८ - २०१९ २०२०

नाशिक - २६ - २९ - २७

अहमदनगर - २७ -- ३२ - ३२

धुळे - २१ -- २१ - १३

नंदूरबार - ११ --- १० - ०८

जळगाव - ३० ---- ३१- २०

------------------------------------------------------------------

एकुण - ११५ ---- १२३ - १००

----इन्फो----

तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक

नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या पाच जिल्ह्यांमध्ये २०२० साली जाळ्यात अडकलेल्या लाचखोर लोकसेवकांमध्ये तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक राहिल्याचे दिसून येते. या पाच जिल्ह्यांत मिळून सुमारे ७६ तृतीय श्रेणीचे कर्मचारी लाच स्वीकारताना सापळ्यात अडकले आहेत. तसेच प्रथम श्रेणीतील ९, अधिकारी द्वितीय श्रेणीतील १३, तर चतुर्थ श्रेणीतील ३ कर्मचारी लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले गेले.

----

-इन्फो--

परिक्षेत्रनिहाय यशस्वी सापळे

मुंबई- २१, पुणे- १३४, ठाणे- ४३, औरंगाबाद- ८८,नाशिक- १००, नागपूर- ७१, अमरावती- ७८, नांदेड- ६७-इन्फो--

----

--कोट---

कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनचा परिणाम भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर गेल्यावर्षी झालेला दिसतो, तरीही शंभर सापळे नाशिक परिक्षेत्रात यशस्वी करण्यास विभागाला यश आले. गेल्यावर्षी नाशिक युनिटने कृषी खात्यातील वर्ग- १, प्रदूषण मंडळातील वर्ग- १ व २, गृह खात्याशी संबंधित वर्ग- १च्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. परिक्षेत्रात झालेल्या एकूण कारवाईत महसूल खात्यासोबत पोलीस खात्यातील लाचखोरीचे प्रमाण अधिक राहिल्याचे दिसते.

- सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

---

२२ब्राईब नावाने फोटो सेव्ह आहे आर वर

डमी फॉरमेट आर वर २२ गव्हर्नमेंट ऑफिसर नावाने सेव्ह आहे.