शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तांचे पेन्शन हलविले; जिल्हा परिषदेचा निर्णय

By admin | Updated: April 18, 2017 00:58 IST

जिल्हा बॅँकेला दणका : पाच कोटींची रक्कम

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसह खासगी क्षेत्रातील शिक्षकांचेही एकीकडे वेतन रखडलेले असतानाच, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने जिल्ह्यातील सुमारे दहा हजार सेवानिवृत्तांचे सेवानिवृत्ती वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत न टाकता अन्य बॅँकेत टाकल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ही रक्कम सुमारे पाच कोटींच्या घरात असल्याचे समजते.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची जिल्हा परिषदेत भेट घेऊन त्यांना सेवनिवृत्तांचे सेवानिवृत्ती वेतन जिल्हा बॅँकेकडून वेळेवर होत नसल्याची तक्रार केली होती. त्यावेळी दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांना याबाबत सूचना देत सेवानिवृत्तांचे तत्काळ वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. तिकडे जिल्हा बॅँकेच्या शिक्षकांनीही वेतन वेळेवर होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे तक्रारी करीत जिल्हा बॅँकेच्या मुख्य शाखेत जाऊन ठिय्या आंदोलन केले होते. (प्रतिनिधी)जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन किमान सेवानिवृत्तांचे सेवानिवृत्ती वेतन वेळेवर होण्यासाठी या महिन्याचे जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे दहा हजार सेवानिवृत्तांचे वेतन जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने जिल्हा बॅँकेत न भरता ती अन्यत्र राष्ट्रीयीकृत बॅँकेत भरल्याचे समजते. त्यामुळे पुढील मे महिन्यातील सेवानिवृत्तांचे सेवानिवृत्ती वेतन त्यांना वेळेवर मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा बॅँकेला त्यांच्या आर्थिक कोंडीला कंटाळून हा पहिला दणका दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.