शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

कळवण तालुक्याचा निकाल ९२.३८ टक्के

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

भक्ती निकुंभ कळवण केंद्रात प्रथम : आरकेएमचा निकाल ८५.६७ टक्के

कळवण : मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत (दहावी) कळवणच्या आरकेएम माध्यमिक विद्यालयाची भक्ती निकुंभ हिने ९५ टक्के गुण मिळवून कळवण केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला असून, कळवण तालुक्याचा निकाल शेकडा ९२.३८ टक्के लागला आहे, तर कळवणच्या आरकेएम माध्यमिक विद्यालयाचा ८६.६७ टक्के निकाल लागला.कळवण तालुक्यातून दोन हजार ७४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी दोन हजार ५५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९२.३८ टक्के लागला असून, शासकीय आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला.आरकेएम माध्यमिक विद्यालयातील ३७७ पैकी ३२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा ८५.६७ टक्के निकाल लागला. शाळेतील भक्ती निकुंभ ९५ टक्के गुण मिळवून कळवण केंद्रात प्रथम आली, तर विद्यालयातील अदिती कोठावदे (९२ .२० टक्के) गुण मिळवून द्वितीय , तर राहुल बाळू सोनवणे ९१.२० टक्के गुण मिळवून तृतीय आला असल्याची माहिती प्राचार्य एन. पी. पवार यांनी दिली.कळवण तालुक्यातील मानूर येथील जनता विद्यालय (८६.३१ टक्के), माध्यमिक आश्रमशाळा (१०० टक्के) निकाल लागला. यशवंतराव चव्हाण विद्यालय निवाने (८८.७३ टक्के), माध्यमिक विद्यालय ओतूर (९८.७२), शासकीय आश्रमशाळा नरूळ (९८.७३), श्रीराम विद्यालय (९६.८८) व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कनाशी (१००), जनता विद्यालय, पाळे (८१.४३), जनता विद्यालय, चिंचपाडा (१००), शासकीय आश्रमशाळा, खिराड (१००), शासकीय आश्रमशाळा, दळवट (९७.३०), कै. गिरजाबाई सोनूजी अहेर माध्यमिक विद्यालय, दळवट (९६.६२), जनता विद्यालय, अभोणा (९२.७८) टक्के निकाल लागला. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मोहनदरी (९६.४३ टक्के), परमपूज्य ओमदत्त ठाकूर माध्यमिक विद्यालय, सप्तशृंगगड (७६.४७), शासकीय आश्रमशाळा, चणकापूर (९८.५९), जनता विद्यालय, काठरे दिगर (९७.७८), माध्यमिक आश्रमशाळा, सुळे (९७.४४), महात्मा फुले हायस्कूल, मोकभणगी (९४.७४), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गणोरे (९८.३९), जनता विद्यालय, रवळजी (७९.१७), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर (१०० टक्के), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, काठरे ( ९२.८७ ), जनता विद्यालय, पिळकोस (९६.४३), माध्यमिक विद्यालय सुकापूर (९४.२३), डी. एन. देशमुख माध्यमिक आश्रमशाळा, आठंबे (१०० टक्के) निकाल लागला.जानकाई माध्यमिक विद्यालय कळवण ( ९०.९१ टक्के), माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळे बु।। (९७.२२), न्यू इंग्लिश स्कूल, विसापूर (७२.३४) , महात्मा फुले हायस्कूल, बेज (९५.२४), कै. दगा रामभाऊ हिरे माध्यमिक विद्यालय, देसराणे (८७.५०), शासकीय आश्रमशाळा, बापखेडा (९८.२५), व्ही. टी. अहेर माध्यमिक विद्यालय, देसगाव (१०० टक्के), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर (१००टक्के), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, काठरे (९२.८६), माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळे बु।। (९७.२२), बायजाई माध्यमिक विद्यालय, पाडगण, पिंपळे खुर्द (८० टक्के), जनता विद्यालय, देसगाव (८४.३८), सप्तशृंगी माध्यमिक विद्यालय, नाळीद (८० टक्के), माध्यमिक विद्यालय, कळवण (६४.७१), चिंतामण गावित माध्यमिक विद्यालय, ओझर (९३.१०), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, खर्डे दिगर (९७.५६), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गोपाळखडी (९७.९६), माध्यमिक विद्यालय, अभोणा (१००टक्के) निकाल लागला आहे.