शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्र म पाठांतराच्या कोंडवाड्यात बंदिस्त

By admin | Updated: January 10, 2015 23:41 IST

सत्यरंजन धर्माधिकारी : सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त येवल्यात कार्यक्रम

येवला : शाळा व महाविद्यालयातील शिक्षण लोप पावत चालले असून, अभ्यासक्रम पाठांतराच्या कोंडवाड्यात बंदिस्त होत चालले आहे याचा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या जबाबदार घटकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी येवल्यात केले.सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष, द्विजन्मशताब्दी संस्थापक स्व. माधवराव नागडेकर यांची जन्मशताब्दी व विद्यार्थी गुणगौरव समारंभ प्रांगणात झाला. यावेळी बोलताना न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, मी स्वत: शिकत असल्यापासून वर्ग खोल्यात बंद करून शिक्षण देण्याची पारंपरिक पद्धत आजतागायत चालू आहे. वर्षानुवर्ष बाल व महाविद्यालयीन विद्यार्थी रडत आहे. मुलांवर जबरदस्ती न करता त्याची वेदना व भावना जाणून शिक्षण देण्याची गरज आहे. आजच्या शिक्षण पद्धतीचे चित्र बदलावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मार्कासाठी परीक्षा व परीक्षेसाठी अभ्यास हे सूत्र न ठेवता सारे काही गुणवत्तावाढीसाठी असले पाहिजे. ज्ञान व माहितीचे मायाजाल ह्यातील फरक जाणून घेण्याची गरज प्रतिपादित करताना वैयक्तिक कामगिरी ही नेहमी चढत्या श्रेणीत असायला हवी, असे सांगितले. मुले निष्कपट, निर्भय, निरागस, असतात. त्यांच्या मनात दुहीची बीजे पेरता काम नये, असेही त्यांनी सुचवले. शाळांमधून शिक्षण हद्दपार होण्यात शिक्षण खात्याचे योगदान मोठे असल्याचा चिमटा न्यायमूर्तींनी घेतला.न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. प्रास्ताविक संस्थेचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र पटेल यांनी केले. पंकज पारख यांनी यांनी मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरणाचे संयोजन संजय बिरारी यांनी केले. यासाठी प्रकाश सोनवणे, आसावरी जोशी, वीणा परते यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)